‘नाशिकचा पुढचा महापौर शिवसेनेचाच’, संजय राऊतांचा दावा

Sanjay Raut

मुंबई : शिवसेनेचे (Shiv Sena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी नाशिकचा (Nashik) पुढचा शिवसेनेचा होईल, असा दावा केल्यानंतर नाशिकच्या राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे. सध्या नाशिक मनपावर भाजपचं वर्चस्व आहे. भाजपचे (BJP) सतीश कुलकर्णी (Satish Kulkarni) हे नाशिकचे विद्यमान महापौर आहे.

मात्र आता महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) आगामी निवडणुका एकत्रित लढणार आहे. त्यामुळे भाजपला निवडणुकीत चांगलीच कसरत करावी लागणार आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीतही याची प्रचिती आली. आता त्याच्या पुढील निवडणुकींचा हा ट्रेलर असल्याचं बोललं जातं आहे. मात्र कुणी कितीही आघाड्या केल्या, तरी भाजपच यशाचा झेंडा फडकवेल, असा दावा भाजप भाजप नेते लक्ष्मण सावजी यांनी केलाय.

तिकडं मनसेही नाशिक मनपा निवडणुकीची जय्यत तयारी केली आहे. भाजपनं मनसेचे अनेक नगरसेवक फोडले. त्यामुळं स्थानिक पातळीवर मनसैनिकांमध्ये भाजपबद्दल संताप आहे. मात्र, असं असलं तरी मनसेची भूमिका कृष्णकुंजवरच ठरणार आहे.

नाशिक मनपामध्ये (Nashik Municipal Corporation) पक्षीय बलाबल

भाजप – 65
शिवसेना – 35
राष्ट्रवादी – 6
काँग्रेस – 6
मनसे – 6
रिपाई – 1

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER