अहमदनगरचा पुढचा महापौर शिवसेनेचाच, मंत्री गडाख यांचा संकल्प

Shankarrao Gadakh-Shivsena

अहमदनगर : राज्याचे जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख (Shankarrao Gadakh) यांनी मागील महिन्यात शिवबंधन हाती बांधून शिवसेनेत प्रवेश केला. मुख्यमंत्री आणि शिवसेना (Shivsena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शंकरराव गडाख यांना पक्षात घेऊन अहमदनगरमध्ये शिवसेनेची ताकद वाढवण्याची रणनीती आखली असून, अहमदनगर महापालिकेत पुढचा महापौर शिवसेनेचाच असणार असा संकल्प गडाख यांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत बोलून दाखवला.

सध्या अहमदनगर महापालिकेत भाजपची सत्ता असून त्यांच्याच महापाैर आहे. शिवसेनेच्या नगरसेवकांची जास्त असूनही शिवसेना सत्तेपासून अलिप्त आहे. सध्या राज्यात महाआघाडी सरकार आहे. शिवसेनेचा मुख्यमंत्री आहे. मग नगरमध्ये शिवसेनेचाच महापाैर असायला हवा. त्याचा फायदा नगरकरांना होऊ शकेल, असा सूर शिवसेनेच्या बैठकीत निघाला. त्यासाठी आता नव्याने शिवसेनेत दाखल झालेले मंत्री शंकरराव गडाख लक्ष घालतील, असे आश्वासन त्यांनी दिल्याने शिवसेनेतील राजकारणाला उकळ्या फुटल्या आहेत.

जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख यांच्या उपस्थितीत शहर शिवसेनेचे पदाधिकारी, नगरसेवकांची बैठक झाली. यावेळी आगामी महापाैर निवडीबाबत चर्चा झाली. आगामी काळात महापाैर निवडीसाठी मंत्री गडाख लक्ष घालणार आहेत. तसेच आश्वासन त्यांनी देऊन यापुढे प्रत्येक आठवड्याला शिवसेनेची बैठक बोलावू, असे त्यांनी सांगितले.

गडाख यांनीही निवडीनंतर लगेचच नगर शहरात लक्ष घालून अंतर्गत गटबाजी संपवू, असे सांगितले. अहमदनगर शहरात शिवसेनेचा आमदार अनिल राठोड यांच्या रुपाने अनेक वर्षे होता. आगामी काळात पुन्हा शिवसेना बळकट करण्यासाठी गडाख प्रयत्न करणार आहेत. त्याचाच एक भाग म्हणून महापाैर शिवसेनेचा करण्यासाठी विशेष प्रयत्न होतील, असे आश्वासन गडाख यांनी पदाधिकाऱ्यांना दिले.

दरम्यान, माजी दिवंगत आमदार अनिल राठोड यांच्या निधनानंतर निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी गडाख यांचा शिवसेना प्रवेश पक्षाला नवसंजीवनी देणारा आहे. शंकरराव गडाख आता शिवसेनेत सक्रिय होऊ लागले असून, जिल्हाभर बैठकांचे नियोजन त्यांनी केले आहे.

ही बातमी पण वाचा : आता खडसेंनी शिवसेनेत यावं, शिवसेनेच्या मंत्र्याकडून खुली ऑफर

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER