अजितदादांच्या नेतृत्वात पुण्याचा पुढचा महापौर राष्ट्रवादीचा, पदाधिकाऱ्यांचा निर्धार

Maharashtra Today

पुणे : जेष्ठ नेते शरद पवार(Sharad Pawar) यांच्या नेतृत्वात स्थापन झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस(NCP) पक्षाचा आज वर्धापनदिन असून, २२ वर्षे पूर्ण केली आहेत. पक्षाच्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून राज्यभरात कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. आज पुण्यातही वर्धापनदिन साजरा करण्यात आला. यावेळी पुणे महापालिकेत पुढचा महापौर आणि सत्ता राष्ट्रवादीची असेल असा निर्धार, पदाधिकाऱ्यांनी केला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना हा निर्धार केला. येत्या महापालिका निवडणुकीत पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकवणार यासाठी जिद्दीने कामाला लागावे. पुण्यात पुढचा महापौर राष्ट्रवादी काँग्रेसचाच असणार आहे. सत्ताधारी भाजपच्या कामावरती पुणेकरांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. पुणेकर आगामी महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकवतील, यात काहीही शंका नाही. अजित पवारांच्या(Ajit Pawar) नेतृत्वात महापालिका जिंकू, असा विश्वास जगताप यांनी व्यक्त केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button