नूतन महापौर पहिल्याच दिवशी पडल्या कामासाठी बाहेर

Kolhapur Mayor

कोल्हापूर :- महापौर सौ. सूरमंजिरी लाटकर यांनी निवड झाल्याच्या पहिल्याच दिवशी कार्यालयीन प्रवेश केला. त्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी शहरातील मंजूर रस्ते व डांबरी पॅचवर्कच्या कामाची पाहणी केली. पूरामुळे व शहरात झालेल्या अतिवृष्टीमुळे बहुतांशी रस्ते खराब झालेले आहेत. महापालिकेच्या वतीने दैनंदिन होणारी पॅचवर्कची कामे, नव्याने सुरु असलेल्या कामाचा आढावा महापौरांनी शहर अभियंता यांच्याकडून घेतला होता.

शिवसेनेच्या किशोरी पेडणेकर मुंबईच्या नव्या महापौर

आज, दुपारी महापौर यांनी कावळा नाका ते तावटे हॉटेल मुख्य रस्त्यावर महानगरपालिकेच्यावतीने सुरु असलेल्या पॅचवर्कच्या कामाची व रुईकर कॉलनी येथे नव्यान करण्यात येत असलेल्या रस्त्याच्या कामाची पाहणी केली. यावेळी संबंधीत ठेकेदार यांना रस्ते दर्जेदार करण्याच्या सूचना महापौरांनी दिल्या.

यावेळी नगरसेविका सौ. उमा इंगळे, शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत, उप-शहर अभियंता हर्षजीत घाटगे, कनिष्ठ अभियंता मिरा नगीमे, अरुणकुमार गवळी आदी उपस्थित होते. विभागीय कार्यालय क्र.1 च्या वतीने निर्माण चौक ते जरगनर नाका मेनरोड, टिंबर मार्केट कमान, विभागीय कार्यालय क्र.3 च्यावतीने उमा टॉकीज ते बागल चौक मेनरोडवर पॅचवर्कचे काम करण्यात आले आहे.

महाविकास आघाडीत फूट पाडण्यात भाजपचे संकटमोचक यशस्वी; नाशिकमध्ये भाजपचा महापौर