कोरोना विषाणूचे नवे रूप सुपर स्प्रेडर मात्र जीवाला धोका कमी

New form of corona virus

नवी दिल्ली :- कोरोना विषाणूचे नवे रूप (स्ट्रेन) इंग्लंडमध्ये आढळले आणि उभे जग हादरले. हा नवा विषाणू यापूर्वीच्या विषाणूच्या स्ट्रेनपेक्षा जास्त धोकादायक आहे. कोरोनाच्या या नव्या स्ट्रेनचा युवा वर्गाला धोका असल्याची माहिती पुढे आली आहे. कोरोना विषाणूचे नवे रूप सुपर स्प्रेडर मात्र मागील तुलनेत जीवाला धोका कमी असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

कोरोना (Corona) संसर्गाने रूप बदलल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने खबरदारी म्हणून काल, मंगळवारी नवी नियमावली जाहीर केली. २५ नोव्हेंबर ते २३ डिसेंबर या ४ आठवड्यांच्या दरम्यान ब्रिटनहून भारतातील विविध राज्यात आलेल्या सर्व प्रवाशांची माहिती घेण्याचे निर्देश मंत्रालयाकडून ब्युरो ऑफ इमिग्रेशनला देण्यात आले आहेत.

निती आयोगाचे सदस्य व्ही के पॉल यांनी याबाबत म्हटले आहे की, कोरोनाचे नवे रुप अधिक संक्रामक आहे. अधिक वेगाने त्याचा फैलाव होऊ शकतो. युरोपीय सेंटर फॉर डिसीज कंट्रोल यांच्या माहितीनुसार, हा विषाणू युवा वर्गाला अधिक प्रभावित करत आहे. शास्त्रज्ञांनी या विषाणूचे B.1.1.7. असे नामकरण केले आहे.

दरम्यान, पॉल म्हणाले, आतापर्यंत उपलब्ध झालेले आकडे आणि विश्लेषणाच्या आधारे सांगू शकतो की घाबरण्याचे कारण नाही. मात्र, सतर्क रहायला हवे. आम्हाला या नव्या आव्हानाला सामोरे जावे लागेल. हा विषाणू ७० टक्के अधिक पटीने संक्रमण फैलावू शकतो असेही सांगितले जात आहे. याला सुपर स्प्रेडर म्हणू शकतो. याने मृत्यू, रुग्णालयात दाखल होणे अथवा गंभीररित्या आजारी होण्याचा धोका मात्र वाढत नाही, असेही म्हटले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER