भारतात जन्मलेल्या कोरोनाच्या नव्या विषाणूनं वाढवली आहे जगाची चिंता

Maharashtra Today

जागतिक आरोग्य संघटनेच्या (World Health Organization) एका खुलाशामुळं जगभरातल्या राष्ट्रांच्या चिंतेत वाढ झालीये. कोरोनाच्या नव्या विषाणूच्या वर्गिकरणासाठी त्यांनी काही बदल केलेत. विशेष म्हणजे हीच गोष्ट भारतासाठी डोकेदुखी ठरणार आहे. कोरोनाच्या नव्या विषाणूचा वेग (New Coronavirus Born) आणि त्यामुळं होणाऱ्या मृतांच्या आकडेवारीत वाढ आणि नवी लस बनवावी लागेल का? हा प्रश्न वैज्ञानिकांसाठी चिंतेचा विषय ठरतोय. कोरोनाचा (Corona) हा नवा विषाणू भारतात तयार झालाय. त्याला ‘बी. १.६१७’ (B. 1.617)हे नाव देण्यात आलंय. इंग्लंडच्या आरोग्य विभागाकडून जागतिक आरोग्य संघटनेला सर्वात आधी कोरोनाच्या या नव्या विषाणूकडे लक्ष देण्याची मागणी करण्यात आली होती. इंग्लंडने जगासमोर कोरोनाच्या नव्या विषाणूबद्दल भूमिका मांडली. आज जगातल्या ४४ देशांमध्ये कोरोनाचा नवा विषाणू पोहचलाय.

डबल म्युटंट

म्युटेशन ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. यात विषाणूच्या संरचनेत वारंवार बदल होत असतात. यामुळं विषाणू जास्त दिवस जिवंत राहतो आणि त्याच्या क्षमतेत वाढ करु शकतो. बी.१.६१७ ला ‘डबल म्युटंट’देखील म्हणलं जातंय. कारण कोरोनाच्या नव्या विषाणूत दोन म्यूटेशन पाहण्यात आलेत. सर्वात आधी मागच्या ऑक्टोबरमध्ये याबद्दल माहिती समोर आली होती. विदर्भातल्या अनेक रुग्णांमध्ये कोरोनोच्या नव्या विषाणूचे नमुने आढळले होते. कोरोना विषाणूच्या दोन वेगवेगळ्या रुपांच्या एकत्रित करणामुळं हा नवा विषाणू तयार झालाय.

दुसऱ्या लाटेसाठी जबाबदार

भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं अक्षरशः थैमान घातलंय. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं विक्राळ स्वरुप धारण केल्यामुळं मोठ्या प्रमाणात जिवीत हानी होत असल्याचं समोर आलंय. भारताच्या या परिस्थीतीला कोरोनाचा नवा विषाणू कारणीभूत असल्याचे अनेक पुरावे समोर आलेत. कोरोनाचा हा नवा विषाणू शरिराची रोगप्रतिकार शक्ती कमी करण्यात अधिक पटाईत आहे. शिवाय लस घेतल्यानंतर शरिरात तयार होणाऱ्या अँटी बॉडीजना तो चकवा देण्यात पटाईत आहे. लस घेतलेल्यांना हा कोरोनाचा नवा विषाणू बाधित जरी करु शकत असला तरी तो जीवघेणा ठरत नाहीये.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळं भारतासमोर मोठं सकंट निर्माण झालंय. यामुळं वैज्ञानिकांपुढील चिंता देखील वाढली आहे. लसींचा प्रभाव होणार नसल्यामुळं हा विषाणू भारतासाठी पुन्हा नवी संकटांची दारं उघडू शकतो. भारतासह जे देश कोरोनाच्या नव्या विषाणूमुळे ग्रासले आहे त्यांच्यावर जागतिक स्तरावरुन दबाव टाकला जात आहे. नव्या विषाणूच्या संक्रमणाचा आणि उपचारांचा संपूर्ण डेटा जगभरातील इतर राष्ट्रांना उपलब्ध व्हावा यासाठी त्याबद्दलची सर्व वैद्यकीय माहितीला व्यवस्थित संग्रही करुन ठेवण्याबद्दल जागतिक आरोग्य संघटना भारतासह इतर ४४ राष्ट्रांकडे विचारणा करत आहे.

भारतात या आधी कोरोनाचा नवा विषाणू बी.१.६२८ ने देखील वैज्ञानिकांची चिंता वाढवली होती. या विषाणूत तीन म्युटेशन पाहण्यात आले होते. याबद्दल विस्तृत माहिती मिळवण्यासाठी मोठी कसरत आरोग्य यंत्रणांना करावी लागली. काही वैज्ञानिकांच्या मते भारतात कोरोनाचे आणखी नवे विषाणू आढळू शकतात. विषाणूच्या वाढीसाठी भारतातील परिस्थीती अनूकुल आहे. भारतातील अफाट जनसंख्या आणि लोकसंख्येची घनता कोरोना विषाणूच्या म्युटेशनसाठी अनुकुल वातावरण तयार करत आहेत. यावर उपाय म्हणून मास्क आणि सोशल डिस्टंसिंगचा काटेकोर अवलंब होणं गरजेचं असल्याचं अनेकांच म्हणनं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button