जपानमध्ये आढळला कोरोनाचा नवा विषाणू, सर्वांपेक्षा वेगळा

Japan Corona Virus

टोकियो :- ब्रिटन, दक्षिण आफ्रिकेनंतर जपानमध्येही कोरोनाचा नवा विषाणू आढळला आहे. हा आधी आढळलेल्या सर्व विषाणूंपेक्षा वेगळा आहे. ब्राझीलमधून जपानमध्ये परतलेल्या चार रुग्णांमध्ये हा नवा विषाणू (स्ट्रेन) आढळला आहे. नव्या विष्णूचे वाहक हे चारही रुग्ण ब्राझीलमधील एमेझॉन राज्यातून आले आहेत.

तज्ज्ञांनी म्हटले आहे की, कोरोनाचा (Corona) हा नवीन विषाणू आतापर्यंत जगामध्ये अन्यत्र कुठेच आढळलेला नाही. यापासून सावध राहा, असा इशारा तज्ज्ञांनी  दिला असून हा विषाणू ब्रिटनमध्ये आढळून आलेल्या विषाणूपेक्षा जास्त संसर्गजन्य असल्याची भीती व्यक्त केली आहे.

हा विषाणू किती संसर्गजन्य आहे आताच सांगता येत नसले तरी तो इतर दोन इतकाच संसर्गजन्य असावा असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या विषाणूचा संसर्ग होण्याचा वेग आणि त्यावर लसीचा परिणाम होईल की नाही हे संशोधनानंतरच कळेल, असे एका वृत्तात म्हटले आहे.

ही बातमी पण वाचा : कोरोना : भारताच्या लसीला जगभरातून मागणी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER