‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ कार्यक्रमात हलगर्जीपणा अधिकाऱ्याला भोवला; गुन्हा दाखल

CM Uddhav Thackeray

मुंबई : राज्यात एकीकडे राजकीय घडामोडींना आलेला वेग तर दुसरीकडे कोरोनाचा उद्रेक. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने सर्वच यंत्रणेला कामाला लावले आहे. परंतु कोरोनाच्या काळात अनेक अधिका-यांकडून हलगर्जीपणाही होत आहे. नाशिकमध्ये एका अधिका-याने खोटी माहिती दिल्यामुळे जिल्हा परिषद अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे (Ravindra Shinde) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अतिवरिष्ठ अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल होण्याची राज्यातील ही पहिलीच घटना आहे. कोरोना पार्श्वभूमीवर गुन्हा दाखल झाल्यानं अधिकारी वर्गात एकच खळबळ उडाली आहे. रवींद्र शिंदे यांच्यावर ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ (My Family My Responsibility) कार्यक्रमात काम करत असता हलगर्जी केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. रवींद्र शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांच्या व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये (Video Conference) खोटी आकडेवारी दिल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. त्यामुळे शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. राजपत्रित वर्ग-१ च्या अधिकाऱ्याविरुद्ध, आपत्ती व्यवस्थापन कायद्याच्या अंतर्गत हा राज्यातील पहिला गुन्हा दाखल झाला आहे.

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रशांत वाघमारे यांनी तक्रार दाखल केल्यानंतर सरकारवाडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे बाबूगिरी करणाऱ्या अधिकाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी कोरोनावर मात करण्यासाठी ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या सरकारी कार्यक्रमाची घोषणा केली आहे. राज्यातील सर्व जनतेला आपल्या कुटुंबाची जबाबदारी घेण्यासाठी आणि कोरोनापासून दूर ठेवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी आवाहन केले होते; पण रवींद्र शिंदे यांच्यावर ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ कार्यक्रमात काम करत असता हलगर्जी केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. त्यामुळे शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER