देशात नव्य संसद भवनाची नव्हे तर, आरोग्य यंत्रणा उभारण्याची गरज, अमोल कोल्हेंची मागणी

Maharashtra Today

मुंबई :- सध्या देशभरात कोरोना (Corona) रुग्णांची आणि मृत्यूंची संख्या झपाट्याने वाढत चालली आहे. रुग्णांना ऑक्सिजन, औषधी, आणि रुग्णालयातील बेडसाठी वणवण भटकावे लागत आहे. यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी ट्विट करत देशातील सध्याच्या कोरोना परिस्थितीवर आपले मत व्यक्त केले. यावेळी त्यांनी देशात सध्या आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करण्याची गरज असल्याचं मत व्यक्त केलं आहे. यासाठी त्यांनी केंद्र सरकारने खासदार कोट्यातील निधींची पूर्तता करावी, अशी मागणी केली आहे. तसेच देशातील कोरोना परिस्थिती भयानक आहे. दररोज १,५०० पेक्षा जास्त रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू होत आहे. त्यामुळे केंद्र सरकारने नव्या संसद भवनाच्या बांधकामावर (New parliament building) पैसे खर्च करण्यापेक्षा देशात आरोग्य यंत्रणा उभी करण्यासाठी प्राधान्य द्यावे, असे मत अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी व्यक्त केले आहे.

आपला देश सध्या मोठ्या संकटाला तोंड देत आहे. देशातील आरोग्याची पायाभूत सुविधा वाढवण्याची गरज आहे. भारताला सध्या नव्या संसद भवनाची नाही तर ऑक्सिजन प्लांट, कोव्हिड सेंटर, आरोग्यासाठी लागणारे महत्त्वपूर्ण साधनसामग्री यांची जास्त आवश्यकता आहे”, असं अमोल कोल्हे म्हणाले.

देशात दररोज २ लाखांपेक्षा जास्त नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळत आहेत. त्याचबरोबर दररोज १,५०० लोक आपल्या जवळच्या नातेवाईकांना गमावत आहे. त्यामुळे केंद्र सरकारने प्राधान्याने नेमकं कोणत्या ठिकाणी पैसे खर्च करावे याबाबत ठरवावे. त्याचबरोबर पंतप्रधान कार्यालयाने MPLAD निधी जाहीर करावे, जेणेकरुन खासदारांना आपापल्या मतदारसंघात आवश्यक उपाययोजना उभारण्यासाठी त्याचा वापर करता येईल, अशी मागणी खासदार कोल्हे यांनी ट्विटच्या माध्यमातून केली आहे.

ही बातमी पण वाचा : कोरोना लसींच्या कच्च्या मालावर निर्यातबंदी, मानवतेचा पुळका असलेल्या अमेरिकची मानवता कुठे हरवली? शिवसेना

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button