कृषी विधेयकांवर मोदी सरकारला पाठिंबा नाही ; शरद पवारांच्या राष्ट्रवादीची भूमिका

Sharad Pawar

मुंबई : केंद्र सरकार कृषि क्षेत्राशी संबंधित तीन विधेयक संसदेत मांडली असून, त्यापैकी दोन विधेयके संसदेच्या दोन्ही सभागृहात मंजूर करण्यात आली आहे. एक विधेयक लोकसभेत मंजूर झालं असून, राज्यसभेत पारित व्हायचं आहे. मात्र, या विधेयकाचा विरोधकांनी विरोधक केला आहे .

महाराष्ट्रात या विधेयकावर राष्ट्रवादीची काय भूमिका आहे याबाबत विचारणा होत होती. राष्ट्रवादी यावर शांत का आहे, पक्षाध्यक्ष शरद पवार हे या विधेयकावर का बोलत नाहीत असे अनेक प्रश्न विचारले जात असतांनाच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी या विधेयकासंदर्भात सोमवारी पक्षाची भूमिका स्पष्ट केली.

राष्ट्रवादी काँग्रेस शेतकऱ्यांच्या बाजूने आहे. बाजार समित्यांचे अधिकार कमी करण्याचं काम या विधेयकामुळे होणार आहे. बाजार समित्या ज्या पद्धतीने संरक्षण देतात तसे संरक्षण आता कोण देणार असा आमचा सरकारला सवाल आहे. या विधेयकावर राष्ट्रवादीने सरकारला पाठिंबा दिलेला नाही असंही त्यांनी स्पष्ट केले .

केंद्र सरकारने एका राज्याची निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन कांदा निर्यात बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. एकीकडे शेतकऱ्यांनी आपला माल कुठेही विकावा अस कायदा करतात आणि दुसरीकडे कांदा निर्यात बंदी करतात हा दुटप्पीपणा आहे अशी टीकाही पाटील यांनी केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER