राष्ट्रवादीने भाजपला टप्प्यात आणले; ‘मी राष्ट्रवादीत जातोय’ कल्याण काळेंची घोषणा

Kalyan Kale - Ajit Pawar - Maharastra Today

पंढरपूर : पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी लवकरच मतदान होणार आहे. मात्र त्यापूर्वीच भाजपला मोठा धक्का बसला आहे. कल्याण काळे यांनी भाजपला राम राम ठोकण्याचा निर्णय घेत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले आहे. येत्या ८ एप्रिल म्हणजे गुरुवारी ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कल्याण काळे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश होणार आहे.

पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. राष्ट्रवादी आणि भाजपनेही ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनं दिवंगत भारत भालके यांचे पुत्र भगीरथ भालके यांना उमेदवारी दिली आहे. तर भाजपकडून समाधान आवताडे यांना निवडणुकीत उतरवण्यात आलं आहे. त्यामुळे भाजप आणि राष्ट्रवादीच्या दिग्गजांकडून विजयासाठी जोरदार प्रयत्न केले जात आहेत. अशा वेळी कल्याण काळे यांचा भाजपला राम राम आणि राष्ट्रवादीतील प्रवेशामुळं राष्ट्रवादीला मोठा फायदा होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

कल्याण काळे यांनी एका कार्यक्रमात केलेल्या वक्तव्याचीही चांगलीच चर्चा झाली होती. आपण यापुढे शरद पवार साहेब जे सांगतील त्या पद्धतीने काम करू, असे कल्याण काळे यांनी काही दिवसांपू्रर्वीच म्हटलं होतं. पवारसाहेबांच्या मदतीमुळेच आज साखर कारखान्यांचे धुरांडे पेटले. आमच्यापण काही चुका झाल्या, परंतु त्यांनी कधीच दुजाभाव केला नाही. शेतकऱ्यांची कारखानदारी नीट चालावी, अशी त्यांची इच्छा आहे. त्यामुळे आज पंढरपुरातील विठ्ठल ,चंद्रभागा आणि भीमा हे कारखाने सुरू झाले आहेत. त्यामुळे आपण यापुढे शरद पवारांच्या नेतृत्वाखाली काम करणार असल्याचे कल्याण काळे यांनी सांगितले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button