‘खट्याळ मुलंतरी शांत होतात, पण यांचा थयथयाट सुरूच’, पेडणेकरांची फडणवीसांवर टीका

Kishori Pednekar - devendra fadnavis - Maharashtra Today

मुंबई : एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याशी संवाद साधत असताना महाराष्ट्राच्या कोरोना (Corona) लढाईचं कौतुक केलं आहे. तर दुसरीकडे भाजप (BJP) नेत्यांकडून महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारवर गंभीर आरोप केले जात आहे. त्यामुळे सत्ताधारी आणिविरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil), विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Praveen Darekar) यांच्यानंतर आता शिवसेनेच्या नेत्या आणि मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनीही या वादात उडी घेतली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याचं कौतुक केल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी राज्यसरकारवर गंभीर आरोप केले. सरकार कोरोना संबंधित खरे आकडे लपवत असल्याचा आरोप त्यांनी केला होता. याच आरोपाला प्रत्युत्तर देताना मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी नाव न घेता देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केलं आहे.

आम्ही कोरोनाबाधितांचे आकडे लपवण्यात तरबेज नाहीत, जे लपवतात त्यांना तो लखलाभ. खट्याळ मुलंतरी कधी ना कधी शांत होतात. पण यांचा थयथयाट कायम सुरूच असतो. आमच्या कामाची उंची त्यांना सहन होत नाही. त्यामुळे त्यांना नेहमी पोटदुखी होते आहे. आम्ही जे करतोय ते जनता बघत आहे. कोरोनाला रोखण्यासाठी आम्ही सर्व ते प्रयत्न करत आहोत. उद्धव ठाकरेंच्या कामाचं नरेंद्र मोदी यांनी कौतुक केलं असताना, महाराष्ट्रातील भाजपचे नेते स्वतः च्या पंतप्रधानांना देखील खोटं ठरवत आहेत का? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला. यासोबतचं लसीकरण ॲप सांभाळण्याची परवानगी आम्हाला देण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button