राष्ट्रवादी युवक काँग्रेसने घेतला ‘हा’ क्रांतिकारी निर्णय

Sarang Punekar - Satyajeet Tambe

अहमदनगर : राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) पक्षात एलजीबीटी समूहासाठी स्वतंत्र विभाग सुरू केल्यानंतर प्रदेश युवक काँग्रेसने त्याही पुढे एक पाऊल टाकले आहे. प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) यांनी तृतीय पंथीय समूहातून येणाऱ्या सारंग पुणेकर यांची थेट प्रदेश प्रवक्तेपदी नियुक्ती केली आहे.

एलजीबीटी समूहातील व्यक्तीला थेट पक्षाच्या मुख्य प्रवाहातच काम करण्याची संधी प्रदेश युवक काँग्रेसने उपलब्ध करून दिली आहे. समाजाने नाकारलेल्या त्या वर्गाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी पुढाकार घेतला. त्यासाठी गेल्या महिन्यात पक्षात स्वतंत्र विभाग स्थापन करून त्यावर पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या.

राजकीय क्षेत्रातील या वेगळ्या प्रयोगाची सर्वच स्तरांतून चर्चा झाली. दरम्यान महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या प्रवक्तापदी तृतीय पंथीय समूहातून येणाऱ्या व समाजाच्या विविध प्रश्नांवर वाचा फोडणाऱ्या सारंग पुणेकर (Sarang Punekar) यांची निवड करण्यात आल्याची घोषणा तांबे यांनी केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER