मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते दि नाशिक ‘रेस्टॉरंट क्लस्टर’चे उद्घाटन

Chhagan Bhujbal

नाशिकमध्ये येणाऱ्या पर्यटकांसाठी दि नाशिक ‘रेस्टॉरंट क्लस्टर’ (Restaurant Cluster)महत्वाचे केंद्र ठरेल असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केले. त्यांच्या हस्ते आज नाशिक शहरातील गोविंद नगर परिसरात दि नाशिक ‘रेस्टॉरंट क्लस्टर’ या समूह हॉटेलचे उदघाटन झाले. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी माजी मंत्री गुलाबराव देवकर, आमदार अनिल पाटील, माजी खासदार समीर भुजबळ, माजी आमदार दिलीपराव सोनवणे, महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कोमर्सचे अध्यक्ष संतोष मंडलेचा, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष ऍड. रवींद्र पगार, जळगाव जिल्हा बँकेच्या अध्यक्ष रोहिणी खडसे, सुरेखा ठाकरे, नाशिकचे माजी महापौर विनायक पांडे,डॉ.कैलास कमोद, नगरसेवक गजानन शेलार,तिलोतीम पाटील, ज्ञानेश्वर रोकडे, रवींद्र पाटील, वेदांशु पाटील, स्वप्नील रोकडे यांच्यासह प्रमुख मान्यवर उपस्थित होते.

यावेळी छगन भुजबळ म्हणाले की, मोठी शहरांची भरभराट होण्यासाठी शहरातील नागरिकांसोबत बाहेरील नागरिकांची मोलाची मदत होते. नाशिकमध्ये धूर ओकणारे कारखाने नको तर पर्यटन, शिक्षण, आरोग्य याचे हब होण्यासाठी प्रयत्न आहे. नवीन उद्योगात जाण्याचे धाडस अनेक लोक करत नाही ते धाडस करण्याची गरज आहे त्यातून चांगल्या संकल्पना बाहेर येतात असे त्यांनी सांगितले. दि नाशिक ‘रेस्टॉरंट क्लस्टर’ ही संकल्पना वेगवेगळ्या शहरात राबवावी त्यामुळे अनेकांना रोजगार उपलब्ध होऊन अर्थकारण वाढणार आहे. दर्जा टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न करण्यात यावा असे संगत कोविड चा प्रादुर्भाव वाढणार नाही यासाठी काळजी घ्यावी असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी माजी मंत्री गुलाबराव देवकर म्हणाले की, या क्लस्टरच्या माध्यमातून खर्चाचे विभाजन होत असल्याने ग्राहकांना कमीत कमी दरात चांगल्या दर्जाचे फूड्स याठिकाणी उपलब्ध होईल. नाशिक करांसाठी आगळं वेगळा प्रकल्प उभा केला आहे. याचा नक्कीच नाशिककर आंनद घेतील असे त्यांनी यावेळी सांगितले.

वेळी आमदार अनिल पाटील, महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कोमर्सचे अध्यक्ष संतोष मंडलेचा, रोहिणी खडसे, माजी आमदार दिलीप सोनवणे, सुरेखा ठाकरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER