विधानपरिषदेच्या उमेदवारांची नावे फक्त पवार आणि मुख्यमंत्र्यांकडे

Sharad Pawar & Uddhav Thackeray

मुंबई :- विधानपरिषदेवर राज्यपाल नियुक्त आमदारांच्या १२ जागांसाठीचे गुपित अजून काही दिवस कायम राहण्याची शक्यता आहे. या नावांचा लिफाफा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे येत्या एक दोन दिवसात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना देणार आहेत. यात कोणाची नावे आहेत, याचे उत्तर अनेक जण शोधत आहेत. अनेकजण आपापल्या परीने अंदाज बांधत आहेत. मात्र ही नावे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) या दोघांनाच माहिती असल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिले आहे.

अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी जळगावमध्ये बोलताना विधान परिषदेवर नियुक्त करण्यासाठी बारा नावे ठरल्याची माहिती दिली. मात्र, ही नावे गुपित आहेत ती फक्त अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाच माहिती आहेत. योग्यवेळी ती नावे आम्ही जाहीर करण्यात येणार असल्याचं अनिल देशमुख यांनी सांगितलं.

विधान परिषदेवर बारा जणांची नियुक्ती केली जाणार आहे. ती नावे तीनही पक्षांकडून सर्वानुमते ठरली आहेत. या नावांच्या संदर्भात मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी घेण्यात आली असून, मुख्यमंत्र्यांच्या स्वाक्षरीने तसे पत्र लवकरच राज्यपालांना देण्यात येणार आहे. काॅंग्रेसच्या नावांची यादी दिल्लीहून थेट मुख्यमंत्र्यांना देण्यात आल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे त्या पक्षातील नावेही कोणाला माहिती नाहीत. यामुळे सध्या विविध नावांचा केवळ अंदाज व्यक्त होत आहे. राष्ट्रवादीकडून एकनाथ खडसे, राजू शेट्टी, आनंद शिंदे आणि यशपाल भिंगे यांची नावे दिल्याची चर्चा आहे. याशिवाय सेनेकडून उर्मिला मातोंडकर, शरद पोंक्षे, सचिन अहिर, राहुल कलान, वरुण सरदेसाई, राजेश क्षीरसागर अशा नावांचा अंदाज आहे. काॅंंग्रेसकडून नसीम खान, सत्यजित तांबे यांच्याही नावाची शक्यता आहे. पण पूर्ण आणि खात्रीलायक नावे कोणाकडेच नाहीत.

ही बातमी पण वाचा : विधानपरिषदेच्या ५ जागांसाठी निवडणूक जाहीर

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER