प्रत्येक स्थानावर दिसले दिल्लीचे नाव; हैदराबादपुढे मुंबईचा अडथळा

IPL 2020 Delhi Capital

नवी दिल्ली :- आयपीएलच्या (IPL) तेराव्या हंगामात ५५ सामन्यानंतर प्लेऑफसाठी तीन संघ निश्चित झाले आहेत. आज लीग स्टेजमधला अखेरचा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद यांच्यात होणार आहे. सलग दोन विजयांनिशी आत्मविश्वास उंचावणाऱ्या सनरायजर्स हैदराबादला बाद फेरीचे स्वप्न साकारण्यासाठी मंगळवारी इंडियन प्रीमियर लीग साखळीमधील अखेरच्या लढतीत मुंबई इंडियन्सला (MI) हरवण्याशिवाय पर्याय नाही.

हैदराबादचा संघ सध्या गुणतालिकेत पाचव्या स्थानावर असला तरी निव्वळ धावगती उत्तम राखल्याने मुंबईविरुद्धचा विजय त्यांना अंतिम चार संघांमध्ये स्थान मिळवून देऊ शकेल.

जॉनी बेअरस्टोला अंतिम ११ जणांमध्ये स्थान न देण्याचा निर्णय घेतल्यापासून हैदराबादला योग्य सांघिक समतोल साधता आला आहे. वृद्धिमान साहा कर्णधार डेव्हिड वॉर्नरला सलामीसाठी अप्रतिम साथ देत आहे, तर जेसन होल्डर अष्टपैलुत्व सिद्ध करीत आहे. रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरुविरुद्धच्या मागील सामन्यात होल्डरने संदीप शर्माच्या साथीने हाणामारीच्या षटकांमध्ये टिच्चून गोलंदाजी केली होती. नटराजन आणि फिरकीपटू रशीद खान यांच्यामुळे हैदराबादचा गोलंदाजीचा मारा वैविध्यपूर्ण असा आहे.

दुसरीकडे, पाचव्या ‘आयपीएल’ विजेतेपदाकडे वाटचाल करणाऱ्या मुंबईला दुखापतग्रस्त कर्णधार रोहित शर्माची उणीव तीव्रतेने भासणार आहे. मात्र तरीही मुंबईने मागील दोन सामन्यांत बेंगळुरू  आणि दिल्ली कॅपिटल्सला नमवून बाद फेरीतील स्थान सर्वप्रथम निश्चित केले आहे.

ट्रेंट बोल्ट आणि जसप्रित बुमरा ही वेगवान जोडगोळी नवा चेंडू हाताळण्यात पटाईत आहे. किरॉन पोलार्ड कुशलतेने नेतृत्व करीत आहे. रोहितच्या दुखापतीबाबत भारताचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी जरी सावधतेचा इशारा दिला असला, तरी पोलार्डने मात्र त्याच्या पुनरागमनाची आशा मागील सामन्यानंतर वर्तवली होती. त्यामुळे रोहितच्या तंदुरुस्तीबाबतचा संभ्रम अद्याप कायम आहे.

ही बातमी पण वाचा : IPL 2020: बंगळुरू विरूद्धच्या सामन्यात दिल्लीचे हे पाच खेळाडू चमकले

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER