विधान परिषदेसाठी शिवसेनेकडून अभिनेते शरद पोंक्षेंचे नावही चर्चेत

shivsena-Sharad Ponkshe

मुंबई : विधानपरिषदेसाठी शिवसेनेकडून अभिनेत्री उर्मिला मातोंडकर (Urmila Matondkar) यांच्या नावाची चर्चा सुरू असतानाच अभिनेते शरद पोंक्षे (Sharad Ponkshe) यांना शिवसेनेकडून उमेदवारी देण्यात येणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

भाजपा शिवसेनेला नेहमी हिंदूत्व आणि सावरकरांच्या मुद्द्यावरून टोमणे मारत असते. भाजपाच्या या टीकेला उत्तर देण्यासाठी पोंक्षे यांना उमेदवारी देण्यात येणार असल्याची चर्चा आहे. पोंक्षे हे हिंदूत्ववादी तसेच सावरकारवादीही आहेत. मात्र, याबाबत एका वृत्त वाहिनीशी बोलताना पोंक्षे म्हणाले की या संदर्भात अजून मला विचारलेले नाही.

आरपीआयचा विरोध

अस्पृश्यतानिवारणात फुले, आंबेडककरांपेक्षा सावरकरांचे योगदान श्रेष्ठ आहे, असे म्हणणाऱ्या शरद पोंक्षे यांना महाविकासआघाडीकडून उमेदवारी देण्यात येऊ नये, अशी मागणी आरपीआयचे अध्यक्ष सचिन खरात यांनी केली आहे.

शिवसेना वेगळा पक्ष आहे. त्यांना त्यांचे उमेदवार निवडण्याचा अधिकार आहे. आम्ही आमचे उमेदवार खूप विचार करून दिले आहेत, अशी प्रतिक्रिया उर्जा मंत्री नितीन राऊत यांनी दिली आहे. तर शरद पोंक्षे यांच्याबाबत आता बोलण्यात काही अर्थ नाही, अशी प्रतिक्रिया मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER