व्हिडीओ क्लिप्स बाहेर आल्यानंतर तोंडं बंद होतील; रेणू शर्मा यांच्या वकिलाचा दावा

Ramesh Tripathi & Dhananjay Munde

मुंबई :- सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर रेणू शर्मा या महिलेने बलात्काराचा आरोप केल्यानंतर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्या आहेत. मुंडे यांनी संबंध सहमतीने होते, म्हणून आरोप फेटाळताना रेणू यांच्यावर ब्लॅक मेलिंगचा आरोप केला. याच्या उत्तरात रेणूचे वकील रमेश त्रिपाठी (Ramesh Tripathi) हे माध्यमांशी बोलताना म्हणालेत की, व्हिडीओ क्लिप्स बाहेर आल्यानंतर तोंडं बंद होतील!

रमेश त्रिपाठी यांनी आरोप केला की, मागच्या चार दिवसांपासून आम्ही तक्रार केली आहे; पण ओशिवरा पोलिसांनी कारवाई केली नाही. त्यामुळे आम्ही निराश आहोत. संबंधित मंत्र्याला ब्लॅकमेल केल्याचा माझ्या अशिलावर करण्यात आलेला आरोप खोटा आहे. माझी अशील महिन्याला १० ते १२ हजार रुपये भाडे भरून ‘पेइंग गेस्ट’ म्हणून राहते. तिची स्वत:ची कुठलीही प्रॉपर्टी नाही. गाडी किंवा घरही नाही. एखाद्याला ब्लॅकमेल करणारी महिला अशी राहणार नाही.

माझ्या अशिलाची दोन वेळच्या जेवणाची भ्रांत आहे. गेल्या तीन महिन्यांपासून ती दागिने विकून गुजराण करते आहे. तिच्यावरील ब्लॅकमेलिंगचा आरोप खोटा आहे. आमच्याकडे भरपूर पुरावे आहेत. सध्या तपास सुरू असल्यामुळे ते उघड करू शकत नाही. तपासातून अनेक गोष्टी समोर येतील. व्हिडीओ क्लिप्स बाहेर आल्यानंतर तोंडं बंद होतील, असे त्रिपाठी म्हणालेत.

ही बातमी पण वाचा : संमतीने ठेवलेले संबंध बलात्कार नसतो – रुपाली पाटील

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER