भारतीय सैन्याचे सर्वात प्रामाणिक साथिदार आहेत ‘हे पाच श्वान’!

Maharashtra Today

१९५९ मध्ये पहिल्यांदा भारतीय सैन्यातल श्वानांचा वापर सुरु झाला. तेव्हा पासून आत्तापर्यंत अनेक प्रजातींच्या श्वानांनी भारतीय सैन्यात सेवाद दिली (The most sincere companions of the Indian Army) आहे. या श्वानांचा वापर जमिनीत लपवलेले भू सुरुंग शोधण्यात आणि ते निकामी करण्यासाठी केला जातो. यासोबतच एखाद्या संदिग्ध व्यक्तीचा शोध घेण्यासाठीही श्वानांना वापरात आणण्यात येतं. आजमितीला अनेक श्वानांची तैनाती विविध विभागत करण्यात आली आहे. तसेच अनेक विरता पुरस्कारांनी श्वानांच्या कार्याचा गौरव करण्यात आला आहे.

चला तर मग पाहुयात भारतीय सैन्यात सेवा देणाऱ्या श्वानांच्या प्रमुख प्रजातींच्या

लॅब्राडॉर

लॅब्राडॉर (Labrador)हा कुटुंबासोबत मिळून मिसळून राहणारा श्वान आहे. त्याची मिळून मिसळून राहण्याची चांगली प्रवृत्ती त्याला सेनेत महत्त्वाचं स्थान देते. हे श्वान जास्तीकरुन प्रामाणिक असतात. त्यांची वास घेण्याची क्षमता कमालीची अफाट असते. व्हिएतनाम युद्धात अमेरिकन सैन्यानं तब्बल चार हजार लॅब्राडॉर श्वानांचा वापर केला होता. जखमी अमेरिकी सैन्याचा शोध घेण्यात आणि पाण्यात लपलेल्या शत्रु सैन्याचा मागोवा घेण्यात त्यांनी महत्त्वपुर्ण भुमिका पार पाडली होती.

भारताचा विचार केला तर लॅब्राडॉर श्वानांनी दहशतवादी कारवायांमध्ये सैन्याची मोठी मदत केली आहे. अनेकदा दहशतवादी आणि भारतीय जवानांमध्ये झडप होते. चकमकी वारंवार सुरु असतात. अशावेळी लॅब्राडॉर श्वानांची मदत घेणं गरजेचं ठरतं. दहशतवाद्यांच्या वासावरुन त्यांना शोधून काढण्याचं काम लॅब्राडॉर करतात. भारतीय सैन्यांवरचा ताण आणि त्यांच्यावरील जीवाचा धोका कमी करण्याची महत्त्वपुर्ण जबादारी लॅब्राडॉर पार पाडतात.

जर्मन शेफर्ड

जर्मन शेफर्ड (German Shepherd) आणि सैन्याचा संबंध खुप वर्ष जुना आहे. पहिल्या महायुद्धावेळी जर्मन सैन्यानं या श्वानांचा पहिल्यांदा प्रयोग केला. या श्वानांनी जर्मन सैन्याची मोठी मदत केली होती. या श्वानांची शारिरीक ठेवण मजबूत असते. युद्धासाठी लागणारी लहान सहान हत्यारं पुरवायचं काम जर्मन शेफर्ड श्वानांनी मोठ्या चतुराईने केलं. सैन्याच्या वेगवेगळ्या तुकड्यांमध्ये संदेश वहनाचं प्रभावी माध्यम म्हणून जर्मन शेफर्ड श्वानांकडे पाहिलं गेलं. जखमी सैनिकांच्या चिकित्सेसाठी त्यांना सहाय्यता प्रदान करण्यासाठी महत्त्वपुर्ण भूमिका या श्वानांनी निभावली. या श्वानांची कामगिरी बघून अमेरिका आणि ब्रिटन सैन्यांनी त्यांना तुकडीत सामाविष्ट करुन घेतलं.

भारतीय सैन्याच्या मुख्य मोहिमांमध्ये जर्मन शेफर्ड श्वानांनी कमालीची भूमिका निभावली. संवेदनशील क्षेत्रांमध्ये संदेश वहन करण्यासाठी या श्वानांचा वापर झाला. काही ठिकाणी सैन्यांना वायरलेसद्वारे संदेश साधनं अशक्य होऊन जातं तेव्हा जर्मन शेफर्ड श्वान सैनिकांच्या उपयोगी पडतात.

बेल्जियन मेलिनोईस

प्रचंड बौद्धिक क्षमता असलेली बेल्जियन मेलिनोईस (Belgian Melinois) ही श्वानाची जमात आहे. आपल्या मालकाप्रति त्यांचा प्रमाणिकपण कमालीचा असतो. अंगकाठीने सडपातळ, चपल आणि मजबूत श्वानांची ऐकण्याची क्षमता कमालीची असते. बेल्जियन मेलिनोईस जमातीचे हे श्वान प्रचंड साहसी आणि चतुर असतात. यांचा प्रयोग प्रामुख्याने बचाव कार्यांमध्ये केला जातो. दुसऱ्या महायुद्धात अनेक राष्ट्रांच्या सैन्यात या श्वानांना स्थान देण्यात आलं होतं.

भारतीय सैन्यानं वैद्यकीय सुविधा पुरवण्या मदत व्हावी म्हणून या श्वानांना सैन्यात सामिल करुन घेतलंय. जर्मन शेफर्ड प्रमाणे संदेशवहनाच्या कामात हे श्वान कमालीचे कामी येतात. ऐकण्याची क्षमता भरपुर असल्यामुळं सीमेवर करडी नजर राखून असलेल्या सैन्यासाठी हे श्वान मोठी मदत करतात.

ग्रेटर स्वीस माउंटन डॉग

ग्रेटर स्वीस माउंटन डॉग(Greater Swiss Mountain Dog) या प्रजातीच्या श्वानांवर तुम्ही डोळे झाकून विश्वास ठेऊ शकता. ते कधीच तुम्ही दिलेल्या आज्ञेचं उल्लंघन करत नाहीत. त्यांच्यामध्ये कमालीची ताकद असते. स्वीत्झर्लॅंडमधील शेतकऱ्यांच्या मदतीला हे श्वान पडतात. यांनी शेतातून जनावर हुसकावण्यापासून ते सामग्रीचे ने आणि करण्यापर्यंत शेतकऱ्यांची मदत केली आहे. ऐतहासिक साधन ही गोष्ट सिद्ध करतात की त्यांचा प्रयोग अनेक युद्धात करण्यात आलाय अगदी मध्ययुगीन काळापासून.

प्राचिन रोम साम्राज्याच्या सैन्यात या श्वानांचा उपयोग होत असे. सद्यस्थितीवर बोलायचं तर दुसऱ्या महायुद्धात या श्वानांचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आला. लष्करांच्या शोध मोहिमेत सिंहांचा वाटा हे श्वान उचलातात. दुरवरच्या लहान सहान हलचाली देखी हे श्वान हेरु शकतात. भारतीय सैन्याद्वारे या श्वानांचा वापर केला जातो. भारताच्या सुरक्षिततेत या श्वानांचं योगदान मोठं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button