इतिहासातील सर्वात लबाड सरकार बघितले, फडणवीसांचा हल्लाबोल

Devendra Fadnavis & Uddhav Thackeray

मुंबई :- सचिन वाझे (Sachin Waze) हे ओसामा बिन लादेन (Osama Bin Laden) नाहीत हे आम्हालाही माहिती आहे. पण तुमचे निर्णय तुघलकी आहेत, असा जोरदार पलटवार करत महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात लबाड सरकार आज आम्हाला पाहायला मिळालं. ठाकरे सरकारचं (Thackeray Government) नाव हे लबाड सरकार म्हणून महाराष्ट्राच्या इतिहासात लिहिलं जाईल, असा जोरदार हल्लाबोल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी ठाकरे सरकारवर केला. आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे सूप वाजले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेनंतर फडणवीसांनी ठाकरे सरकारचा समाचार घेतला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर एन्काऊंटर स्पेशालिस्ट सचिन वाझे प्रकरणी विरोधकांवर हल्ला चढवला होता. वाझे ओसामा बिन लादेन असल्याचं चित्रं विरोधक कशासाठी तयार करत आहेत? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला होता. त्याला देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार जोरदार प्रत्युत्तर दिलं. सचिन वाझेंना आता वकिलाची गरज भासणार नाही. कारण त्यांच्यासाठी स्वतः उद्धव ठाकरे वकील आहेत. वाझेंकडे असे काय पुरावे आहेत की ज्यामुळे त्यांच्यावर सरकार कारवाई करत नाही? असा प्रश्न उपस्थित करतानाच वाझे हे ओसामा नाहीत हे आम्हालाही माहीत आहे. पण मुख्यमंत्री मात्र तुघलकी निर्णय घेत आहे, अशी टीका फडणीस यांनी केली.

यावेळी त्यांनी संजय राठोडांच्या (Sanjay Rathod) राजीनाम्यावरुनचिमटा काढला. बिचारे संजय राठोड हे मंत्री असूनही त्यांचा राजीनामा घेण्यात आला. पण एपीआय वाझेंचा राजीनामा घेतला जात नाही. त्याचं कारण असं की राठोड हे सरकार हलवू शकत नाही. पाडू शकत नाही. पण वाझेंकडे निश्चितच असं काही आहे की ज्यामुळे ते सरकार हलवूही शकतात आणि पाडूही शकतात. त्यामुळे वाझेंना अटक केली जात नाही. त्यांच्याकडे निश्चितच असं काही असावं त्यामुळे हे सरकार घाबरत आहे, असंही त्यांनी सांगितलं.

महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात लबाड सरकार आज जनतेला बघायला मिळालं. ठाकरे सरकारचं नाव हे लबाड सरकार म्हणून महाराष्ट्राच्या इतिहासात त्याची नोंद केली जाईल. याचं कारण अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी शेतकऱ्यांच्या वीज कापणार नसल्याचं सरकारने मोठ्या थाटात घोषित केलं होतं आणि शेवटच्या दिवशी त्यावरची स्थगिती उठवण्यात आली आहे. ही सर्वात मोठी लबाडी आहे. ही स्थगिती उठवण्यासाठी दिलेली कारणं पूर्णपणे चुकीची, असत्य, विसंगत आहेत. त्याच्यावरही आम्ही हक्कभंग निश्चित आणू. महाराष्ट्रातील शेतकऱ्याला, गरीब वीज ग्राहकाला, या सरकारने शॉक दिला. हे लबाड सरकार आहे, असं फडणवीस म्हणाले.

महाराष्ट्रात महाविकासआघाडी (Mahavikas Aghadi) सरकार आल्यानंतर २५०० शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. महाविकासआघाडी सरकार देखावा निर्माण करत आहे. त्यांच्या नौटंकीमुळे राज्याचं मोठं नुकसान होतं आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दिलासा नाही. पीक विम्याबाबत खोटी माहिती दिली गेली. पीक विम्याबाबत कंपनी निवडण्याचं काम राज्य सरकारचं आहे. पीक विम्यासंदर्भातील निकष राज्य सरकारनं बदलले. त्यामुळे शेतकऱ्यांना फायदा झाला नाही, असंही त्यांनी सांगितलं.

ही बातमी पण वाचा : ‘फडणवीस पुन्हा येतीलच तुम्हीही या’, भाजप नेत्याची अजितदादांना थेट ऑफर

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER