जेवढे मला छळाल, तेवढा तुमच्या बरोबरचा वर्ग तुम्हाला सोडून राष्ट्रवादीमध्ये येईल – एकनाथ खडसे

Eknath Khadse

जळगाव :- मला जेवढे छळाल तेवढे भाजपला (BJP) महागात पडेल. जेवढे मला छळाल, तेवढा तुमच्या बरोबर असलेला वर्ग तुम्हाला सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) दाखल होईल. ईडी सीडी नंतर आता राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी भाजपला थेट नेते सोडून जाणार असा इशाराच दिला आहे.

मुक्ताईनगरमध्ये राष्ट्रवादीने आयोजित एका मेळाव्यात ते बोलत होते. खडसे म्हणाले, नाथाभाऊला कसे तुरुंगात टाकता येईल, यासाठी भाजपकडून सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. परंतु मी आयुष्यभर कधीही दोन नंबरचे धंदे केले नाहीत. जिल्ह्यात कोणाकडून नोकरीसाठी किंवा भरतीसाठी एक रुपया घेतला नाही. असे असेल तर कुणी सांगावे, तोंडात शेण घालावे, असे म्हणत खडसे यांनी भाजला सुनावले.

मला अडकवण्यासाठी छळणे सुरू आहे असेही खडसे यावेळी म्हणाले. मात्र भाजप यात कधीही यशस्वी होणार नाही उलट मला जेवढं छळतील तेवढे त्यांच्यासोबतचे लोक माझ्या बरोबर राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये दाखल होईल असा इशारा एकनाथ खडसे यांनी यावेळी दिला.

ही बातमी पण वाचा : अखेर राष्ट्रवादीच्या बॅनरवर एकनाथ खडसेंचे फोटो झळकले

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER