‘कोकणवासियांचं मनोबल अढळ आहे आणि ते तसंच राहायला हवं’ – मनसे

Maharashtra Today

रायगड : अरबी समुद्रात सक्रिय असलेल्या ‘तौत्के’ चक्रीवादळाचा (Tauktae Cyclone) सर्वाधिक फटका कोकणाला बसला आहे. चक्रीवादळामुळे राज्यातील पहिला बळी हा कोकणातीलच आहे. रायगडमधील उरण शहरातील बाजारपेठेत भिंत कोसळून एका महिलेचा मृत्यू झाला. कोकण किनारपट्टीला समांतर वाटचाल करत असलेल्या तौत्के चक्रीवादळाने तीव्र गती घेतली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस होत आहे. या पावसामुळे अनेक ठिकाणी झाड कोसळल्याची घटना समोर आली आहे. दरम्यान, दरवर्षी कोकणाला नैसर्गिक आपत्तीचा सामना करावा लागतो, मात्र कोकणवासियांचं मनोबल अढळ आहे आणि ते तसंच राहायला हवं, असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने(MNS) म्हटले आहे.

‘तौत्के’ चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मनसेच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून एक पोस्ट टाकण्यात आली आहे. ‘आपलं कोकण सलग २ वर्ष कोरोनाशी झुंजतंय, चक्रीवादळांचा तडाखा सहन करतंय… घरांची पडझड, झाडं उन्मळून पडणं, गावांचे संपर्क खंडित होणं अशा अपरिमित नुकसानातही कोकणवासियांचं मनोबल अढळ आहे आणि ते तसंच राहायला हवं… वादळी इतिहासाची साक्ष देणाऱ्या जलदुर्गांप्रमाणे! #महाराष्ट्रधर्म’, असे म्हणत मनसेने कोकणवासियांचे मनोबल उंचावण्याचे प्रयत्न केले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button