मान्सून १ जूनला केरळात पोहचणार

Kerala Monsoon

नवी दिल्ली : मान्सूनच्या प्रगतीसाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे यंदा नैऋत्य मोसमी वारे अर्थात मान्सूनचा पाऊस १ जूनपर्यंत केरळात दाखल होऊ शकतो असा अंदाज भारतीय हवामान विभागाने अंदाज वर्तवला आहे. भारतात पावसाळ्याबाबतची ही शुभवार्ता आहे.

दक्षिण पूर्व आणि मध्य पूर्व अरबी समुद्रात ३१ मेपर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मान्सून ठरलेल्या वेळेत म्हणजे १ जूनपर्यंत केरळात दाखल होण्याची शक्यता आहे. मान्सूनचा भारतात प्रवेश सर्वसाधारणपणे दक्षिणेकडून म्हणजे केरळमधून होतो.

१ जूनला केरळमध्ये मान्सून दाखल झाला नाही तर संपूर्ण भारतातही मान्सूनचे वेळापत्रक बदलते. अंदमानचा समुद्र, अंदमान-निकोबार बेट, बंगालच्या उपसागराचा भाग आणि मालदीवच्या कोमोरीनपर्यंत मान्सून पोहचला आहे. पुढच्या ४८ तासांत मान्सून मालदीवच्या काही भागांत पोहचेल, असा हवामान खात्याचा अंदाज आहे. पश्चिम मध्य अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. वादळाची शक्यता असल्यामुळे केरळमध्ये मच्छीमारांना रात्रीपर्यंत किनाऱ्यावर पोहचण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ज्यांना पोहचणे शक्य नाही त्यांनी जवळचा किनारा गाठवा असे सुचवले आहे. हवामान विभागाने याआधी ६ जूनपर्यंत मान्सून केरळमध्ये दाखल होईल, असे म्हटले होते; पण आता हवेच्या मान्सूनला अनुकूल प्रवाहामुळे मान्सून १ जूनला केरळमध्ये पोहचण्याची शक्यता आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER