राजसत्तेने चर्चेची दारे बंद करु नयेत : सुशीलकुमार शिंदे

Sushilkumar_Shinde

कोल्हापूर : पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांवर लोक टीका करतात. टीका सहन करुन लोक कल्याणासाठी चर्चेची दारे सुरू ठेवणे हे राजसत्तेचे काम आहे. कडाक्याच्या थंडीत दिल्लीत आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांशी चर्चेतून मार्ग काढावा, असे आवाहन माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे (Sushilkumar Shinde) यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केले.

डॉ. वि. ह. वझे मार्ग उद्घाटन समारंभासाठी शिंदे कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. यावेळी गृहराज्यमंत्री सतेज पाटील, आमदार ऋतुराज पाटील, आ. चंद्रकांत जाधव, आ. जयंत आसगावकर आदी उपस्थित होते. शिंदे म्हणाले, सर्व विरोधी आघाडी शेतकऱ्यांच्या बाजूने आहेत. हे सरकार विरोधी पक्षाला श्रेय देणार नाहीत. विरोधीपक्ष हा लोकशाहीतील पाया असल्याचे त्यांना मान्य नाही. विरोधी पक्षाचे म्हणणे ऐकुण मार्ग काढण्याची गरज आहे. तरीही सरकारने थेट शेतकऱ्यांशी चर्चा करावी. शेतकऱ्यांचा भल्यासाठी निर्णय झाला तर विरोधकही साथ देतील. हे सरकार हुकूमशाहीकडे जाणारे असल्याचा आपला अंदाज खरा ठरत आहे. नोटाबंदीनंतर परिस्थिती तशीच असल्याने दर तीन महिन्याला केंद्र सरकार आकडेवारी जाहीर करते. परंतू तीही संशयास्पद आहे.

ठाकरे यांचे काम कौतुकास्पद

काँग्रेस नेतृत्वात योग्य वेळी बदल होतील, तूर्त बदल होणार नाहीत, हे स्पष्ट करुन शिंदे म्हणाले, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे काम कौतुकास्पद आहे. सुरुवातीला काँग्रेसचा सेक्युलरायझेशनचा विचार करत होता. परंतू शिवसेनेनेही त्यांच्या मुळ विचारसरणीला वळण दिली आहे. मागील वेळी सत्तेत असणारे लोकच भांडत होते. आमदार एकमेकावर टिका करत होते. काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या विचारसरणीने कॉमन मिनिमम प्रोग्राम नुसार काम सुरु आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER