माझ्या राष्ट्रवादीत प्रवेशाबाबतचे मुहूर्त तुमचेच! एकनाथ खडसेंच्या प्रसार माध्यमांना टोमणा

Eknath Khadse

जळगाव : भाजपाचे (BJP) ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) उद्या घटस्थापनेच्या शुभ मुहूर्तावर राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षात प्रवेश करणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात जोरात होती. याबाबतच्या प्रश्नाला उत्तर देतांना खडसे यांनी प्रसार माध्यमांना टोमणा मारला, माझ्या राष्ट्रवादीत प्रवेशाबाबतचे मुहूर्त सारे तुमचेच!

गेल्या काही दिवसांपासून खडसे राष्ट्रवादीत जाणार अशी शक्यता अनेक प्रसार माध्यमे व्यक्त करत होती. आता तर, खडसे उद्या घटस्थापनेच्या शुभ मुहूर्तावर राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षात प्रवेश करणार असा मुहूर्तही घोषित झाला होता.

खडसे आज (१६ ऑक्टोबर) रोजी जळगावला आले होते. येथे पत्रकारांनी त्यांना त्यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करण्याबाबत प्रश्न विचारला त्यावर त्यांनी उत्तर दिले – मला या विषयावर काहीही बोलायचे नाही. माझ्या राष्ट्रवादी प्रवेशाबाबतचे सर्व मुहूर्त हे तुम्हीच म्हणजे माध्यमांनीच ठरवले आहेत!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER