कॅटरीना कैफ दोन मिनिटे बोलली तो क्षण ऑफ फील्ड मोमेंट ठरला विराटसाठी

Maharashtra Today

भारतीय क्रिकेट टीमचा आणि कालपासून सुरु झालेल्या आयपीएलमध्ये (IPL) रॉयल चॅलेंज बेंगलुरु (RCB) टीमचा कॅप्टन विराट कोहली (Virat Kohli) आज प्रचंड लोकप्रिय आहे. बॉलिवूडमधील कलाकारांना तो आता केव्हाही भेटू शकतो आणि त्यांच्याबरोबर हवा तेवढा वेळ गप्पाही मारू शकतो. याचे आणखी एक कारण म्हणजे बॉलिवूडशी त्याचे आता अत्यंत घनिष्ठ संबंध जुळलेले आहेत. बॉलिवूडची आघाडीची नायिका अनुष्का शर्मा (Anushka Sharma) त्याची पत्नी आहे. हे दोघे आता एका मुलीचे आई-बाबाही झाले आहेत. पण विराट जेव्हा नवीन होता तेव्हा मात्र बॉलिवूड कलाकारांबाबत तेव्हा खूप क्रेझ होती. त्या काळात एकदा कॅटरीना कैफ (Katrina kaif) त्याच्याशी दोन मिनिटे बोलली होती तो क्षण तो त्याच्या आयुष्यातील ऑफ फील्ड मोमेंट असल्याचे त्याने सांगितले होते. त्याचा हा जुना व्हीडियो कालपासून सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हीडियोमध्ये तो कॅटरीनाबाबत बोलताना दिसत आहे.

या व्हीडियोमध्ये अँकर विराटला त्याच्या आयुष्यातील सगळ्यात मोठी ‘ऑफ फील्ड मोमेंट’ कोणती असा प्रश्न विचारताना दिसत आहे. यावर विराट म्हणतो, ऑफ फील्ड? कॅटरीना कैफने माझ्यासोबत चक्क दोन मिनिटे बोलणे केले होते. ही माझी सगळ्यात मोठी मोमेंट आहे. यानंतर विराट हसताना दिसतो. अँकर- हे खरे का अशी विचारते तेव्हा विराट म्हणतो, मी खोटं कशाला बोलू? विराटचा हा व्हीडियो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून त्याच्या फॅन्सच्या प्रतिक्रियांचा आणि लाईक्सचा पाऊस या व्हीडियोवर पडत आहे. काही तासातच या व्हीडियोला लाखों हिट्स मिळाले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button