भविष्यासाठी मोदी सिस्टिमला झोपेतून उठवणे आवश्यक; राहुल गांधींचे मोदी सरकारवर शाब्दीक हल्ले

Rahul Gandhi - PM Narendra Modi

नवी दिल्ली :- कोरोनाच्या (Corona) या दुसऱ्या लाटेने महाराष्ट्रसह देशात परिस्थिती बिकट आहे. सर्वसामान्यांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अशातच कोरोनाची तिसरी लाट (Corona 3rd Wave) येणार असल्याचे संकेत तज्ञांनी स्पष्ट केले आहे. तसेच, या लाटेचा लहान मुलांना सर्वाधिक धोका असल्याचे सांगितले जात आहे. आगामी काळात मुलांना कोरोनापासून वाचविण्याची गरज आहे. या परिस्थितीत सर्व तयारी अगोदरच पूर्ण करावी लागेल, असे म्हणत काँग्रेस नेते राहुल गांधींनी (Rahul Gandhi) पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. या काळात विरोधकांकडून केंद्रावर जोरदार टीकास्त्र सुरू आहे.

ही बातमी पण वाचा : PMCares फंडचे व्हेंटिलेटर आणि नरेंद्र मोदी ‘दोनों फेल हैं; राहुल गांधींचा केंद्रावर निशाणा

“येणाऱ्या काळात मुलांना कोरोनापासून संरक्षित करणे आवश्यक आहे. अशा परिस्थितीत बालरोग सेवा आणि लस उपचार प्रोटोकॉल आधीच तयार करणे आवश्यक आहे. भारताच्या भविष्यासाठी मोदी सिस्टिमला झोपेतून उठवणे आवश्यक आहे.” असा टोला राहुल गांधी यांनी मोदी सरकारला लगावला.

Disclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button