मोदी सरकारच्या डिजिटल स्ट्राइकने चीनचा हिस्सा २९ टक्के घटला

PM Modi - China

नवी दिल्ली : भारत आणि चीन सीमेवरील तणावानंतर नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) सरकारने केलेल्या ‘डिजिटल स्ट्राइक’चा परिणाम आता मोठ्या प्रमाणात दिसू लागला आहे. ऍप  मार्केटमधील चीनचा दबदबा कमी झाला असून, भारतीय ऍपचा चांगला बाजार मिळाला. भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये लडाख येथील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर झालेल्या हिंसक झटापटीनंतर ‘डिजिटल स्ट्राइक’ करत सुरुवातीला टिकटॉक, हॅलो, पबजी यांसारख्या प्रचंड लोकप्रिय ऍप्ससह ५९ अँप्सवर बंदी घातली. ऍप्सफ्लायर या कंपनीने केलेल्या सर्व्हेक्षणात ऍपवर घालण्यात आलेल्या बंदीनंतर चीनची  ऍप  मार्केटमधील हिस्सेदारी सुमारे २९ टक्क्यांनी घटली, असे लक्षात आले आहे.

अमेरिकन, रशिया आणि इस्रायल ऍप्सचा धडाका

सन २०२० मध्ये चिनी  ऍप  डाऊनलोड करण्याचे प्रमाण २९ टक्क्यांनी घटले आहे तर भारतीय  ऍप  डाऊनलोड करण्याचे प्रमाण ३९ टकके वाढले, असे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. अमेरिका, रशिया, इस्रायल, जर्मनी या देशात विकसित करण्यात आलेल्या ऍप्सच्या धडाक्याचाही चिनी   ऍप्सवर परिणाम झाला आहे.

भारताच्या ग्रामीण भागातून मागणी अधिक

ऍप्सफ्लायर कंपनीचे भारतातील व्यवस्थापक संजय त्रिसाल यांनी याबाबत माहिती दिली. ते म्हणाले की, भारतातील निमशहरी आणि ग्रामीण भागात भारतीय  ऍप्सना मोठी मागणी असल्याचे दिसून आले आहे. टियर-२ आणि टियर-३ भागातील शहरांमध्ये भारतीय  ऍप्सना ८५ टक्के मागणी असल्याचेही त्रिसाल यांनी सांगितले. भारतीय कंपन्यांनी विकसित केलेल्या गेमिंग, फिनटेक आणि मनोरंजन गटातील  ऍप्स निम-शहरी आणि ग्रामीण भागात सर्वांत लोकप्रिय आहेत. छोट्या शहरात भारतीय  ऍप्सच्या डाऊनलोडिंगचे प्रमाण जास्त आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER