भ्रष्ट-कामचुकार कर्मचाऱ्यांना मोदी सरकार पाठवणार घरी

Modi government will send corrupt employees home

दिल्ली : केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांमधील भ्रष्ट-कामचुकार कर्मचाऱ्यांना घरी पाठवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. केंद्रीय कार्मिक मंत्रालयाने यासंदर्भात सर्व विभागांना आदेश दिले आहेत.

यासाठी, ३० वर्ष सेवा किवा ५० ते ५५ वर्ष वय असलेल्या कर्मचाऱ्यांच्या कामाचा आढावा घेतला जाणार आहे. तसे आदेश केंद्र सरकारने दिले आहेत. सर कर्मचाऱ्यांच्या सेवा कार्यकाळातल्या अकार्यक्षमता किवा भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी करण्यात यावी, असे केंद्राने म्हटले आहे.

या चौकशीत दोषी आढळणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्यांचा सेवा कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच निवृत्त करण्यात येईल. त्यांना स्वेच्छा सेवानिवृत्ती घेण्यास सांगितले जाईल. अशा कर्मचाऱ्यांची यादी तयार करण्याचे आदेश केंद्रीय कार्मिक मंत्रालयाने दिले आहेत.

 बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER