गजानन महाराज संस्थानचा आदर्श; २ कोटीत उभारले कोविड सेंटर, ८ कोटी परतही केले

Covid Center - Maharastra Today
Covid Center - Maharastra Today

बुलढाणा : राज्य सरकारने कितीही कोटी रुपयांचा निधी दिला तरी तो कमीच पडतो, हा आजपर्यंतचा अनुभव आहे. राजकीय नेते मंडळी तर अधिकच वाढीव निधी मागणी करताना आपण अनेकदा बघितलेले आहे. मात्र शेगावच्या श्री गजानन महाराज संस्थानने आपल्या वृत्तीतून सर्वांपुढे आदर्श ठेवला आहे.

राज्य सरकारने संस्थानला १० कोटी रुपयांचा निधी दिला, मात्र २ कोटी रूपयात कोविड सेंटर उभारुन शिक्लक राहिलेले ८ कोटी रुपये राज्य सरकारला परतही केले. याच ठिकाणी राजकीय मंडळी असती तर त्यांनी आणखी अधिकच निधी मागवून घेतला असता, मात्र संस्थानने सर्वांनीच आदर्श घ्यावा असं कार्य केलं आहे. महाराष्ट्र सरकारने कोविड केअर सेंटर उभारण्यासाठी श्री गजानन महाराज संस्थानला १० कोटी रुपये दिले होते.

दिलेल्या निधीत कोविड सेंटरमध्ये सर्व अत्यावश्यक सुविधा उपलब्ध करन देणे अपेक्षित होते. संस्थानने कोविड सेंटर उभारण्यासाठी पुढाकार घेतला आणि अवघ्या २ कोटी रुपयात कोविड केअर सेंटर उभे करुन उर्वरीत ८ कोटी रुपये शासनाला परत केले. प्रत्येक कामामध्ये कुचराई आणि भ्रष्टाचार करणाऱ्यांना संस्थानने मोठी चपराक लगावली आहे. मनात असेल तर कोणतीही गोष्ट कमी खर्चात देखील उभी केली जाऊ शकते याचे उत्तम उदाहरण श्री गजानन महाराज संस्थानने राज्याला दाखवून दिले. संस्थानचे अध्यक्ष श्री भाऊ शिवशंकर पाटील यांनी हे कोविड केअर सेंटर उभे करुन दाखविले आहे. संस्थानच्या या कार्याचा इतरांनीही आदर्श घ्यायला हवा.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button