उगाचच काहीतरी झगामगा माझ्याकडे बघा, हे असं चालत नाही ; युतीच्या चर्चेवरून मनसे आमदाराने शेलारांना सुनावले

Raju Patil-Ashish Shelar

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून मनसे (MNS) आणि भाजपच्या (BJP) युतीच्या चर्चांनी जोर धरला आहे. याला कारणही तसेच आहे. येणा-या महापालिका निवडणुका पाहता मनसे आणि भाजपमध्ये जवळीक वाढल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे मनसेची शिवसेनेवर वारंवार टीका तर भाजपसोबतची जवलीक यामुळे मनसे – भाजप युतीच्या चर्चा होत आहेत.

त्यामुळे दोन्ही पक्षाच्या नेत्यांना माध्यमं युतीबाबत विचारणा करत आहेत. भाजप नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांच्याशी या युतीबाबत विचारले असता, त्यांनी यावर जी प्रतिक्रिया दिली होती, त्यावरून मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांनी खोचक प्रत्युत्तर दिलं आहे.

आम्ही त्यांना विचारलंच कुठे आहे. आम्हाला घ्या असे आम्ही त्यांना विचारायला गेलो आहे का? आम्ही विचारलं तर तुम्ही त्यावर बोला. प्रतिक्रिया द्या. जर आम्ही विचारलचं नाही, तर यावर का प्रतिक्रिया देत आहात,” असा टोला राजू पाटील (Raju Patil) यांनी लगावला.

आम्ही अजून तरी भाजप-मनसे युतीची बातचीत केलेली नाही. अकेले दम पर भी हम इतिहास करने वाले है,” असे आशिष शेलार म्हणाले होते. या प्रतिक्रियेला उत्तर देताना राजू पाटील यांनी शेलारांना सुनावले आहे.

दरम्यान काही दिवसांपूर्वी भाजपचे नेते आणि आमदार प्रसाद लाड यांनी कृष्णकुंजवर जाऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. येत्या महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि मनसेची जवळीक वाढत असल्याची चर्चा आहे. त्यानिमित्ताने ही भेट होती का? असा प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चिला जात आहे.

तसेच, यालाच दुजोरा म्हणजे, राज ठाकरे यांच्यापाठोपाठ भाजप नेते, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनीही अयोध्येला जाणार असल्याचे सांगितले आहे.

ही बातमी पण वाचा : राज ठाकरेंचा अयोध्या दौरा यशस्वी होवो, नारायण राणेंच्या मनसेला शुभेच्छा ; शिवसेनेवर टिकास्त्र

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER