मनसेच्या धड्याने नागपुरातील ‘ती’ निर्दयी माता वठणीवर, मदतही केली

MNS - Maharashtra Today

नागपूर : काही दिवसांपूर्वी एक व्हिडीओ सोशल मीडियात चांगलाच व्हायरल झाला होता. या व्हिडीओत एक महिला आपल्या सहा महिन्यांच्या मुलाला बेदम मारहाण करत असल्याचं दिसत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आणि सर्वांनीच महिलेच्या या कृत्यावर संताप व्यक्त केला होता. याच निर्दयी मातेला मनसेच्या महिला कार्यकर्त्यांनी चांगलाच धडा शिकवला. मनसे स्टाईलने धडा शिकवल्यानंतर ती निर्दयी माता वठणीवर आली आणि पुन्हा कृत्य करणार नसल्याची ग्वाहीपण दिली. आणि जाता जाता मनसेच्या महिला पदाधिकाऱ्यांनी तिला आर्थिक मदतही केली.

सोशल मीडियात व्हायरल झालेला तो व्हिडीओ नागपूर शहरातील असल्याचं लक्षात येताच मनसेच्या महिला पदाधिकाऱ्यांनी या निर्दयी मातेच्या घराचा शोध घेतला. त्यानंतर मनसेच्या महिला पदाधिकारी थेट या महिलेच्या घरी दाखल झाल्या आणि तिला आपल्या मनसे स्टाईलने धडा शिकववत चांगलीच जिरवली. मनसे महिला पदाधिकाऱ्यांनी केवळ या महिलेला धडा शिकवला नाही तर त्याच दरम्यान मनसे महिला पदाधिकाऱ्यांनी या महिलेला आर्थिक मदत सुद्धा दिली. तसेच जर मदतीची आवश्यकता असल्यास आम्हाला संपर्क कर असंही या महिलेला सांगितलं.

Disclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button