‘शेवटच्या दोन दिवसात जो चमत्कार झाला’, अजितदादांनी सांगितलं पंढपूरच्या पराभवाच कारण

Maharashtra Today

पुणे : ‘शेवटच्या दोन दिवसांत जो ‘चमत्कार’ घडून आला, त्या ‘चमत्कारा’ला आम्ही कमी पडलो. म्हणून पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीत आमचा पराभव झाला आणि भाजपचे समाधान आवताडे निवडून आले,’ अशा शब्दांत पोटनिवडणुकीतील राष्ट्रवादीचे उमेदवार भगिरथ भालके(Bhagirath Bhalke) यांच्या पराभवाच नेमकं कारण राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी सांगितलं.

पुण्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत अजित पवार बोलत हेाते. यावेळी त्यांनी पंढरपूरच्या पराभवाचे कारण स्पष्ट केले. चुरशीने झालेल्या पोटनिवडणुकीच्या निकालात भाजपचे समाधान आवताडे यांनी भगिरथ भालके यांच्यावर ३७३३ मतांनी विजय मिळविला होता. त्याबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना अजित पवार यांनी वरील स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले की, लोकांनी आमच्याबाजूने मतं दिली नाहीत, त्यामुळे आमचा पराभव झाला. लोकांनी मतं का नाही दिली, तर मागच्या निवडणुकीत परिचारक हे भारतीय जनता पक्षाकडून, समाधान आवताडे हे अपक्ष उभे होते. मागच्या निवडणुकीत जो अपक्ष उमेदवार पराभूत झाला होता. त्या अपक्ष उमेदवाराला म्हणजे आवताडे यांना भाजपने तिकिट दिलं. त्यामुळे आवताडे यांना मानणारी मतं आणि परिचारक म्हणजे भाजपची मते अशी ती एकत्रित करण्याचा प्रयत्न केला. आम्हीदेखील मागच्या भारत भालके यांच्या निवडणुकीपेक्षा जादा मते घेतली आहेत. आम्हीही विजयापर्यंत पोचत आलो होतो. पण, शेवटच्या दोन दिवसांत जो चमत्कार झाला, त्या चमत्काराला आम्ही कमी पडलो. म्हणून ते निवडून आले.

दरम्यान, यावेळी उजनी धरणाच्या पाणीप्रश्नावरही भाष्य केले. उजनीच्या पाणीप्रश्नी सोलापूर जिल्हा, तेथील शेतकरी आणि लोकप्रतिनिधींनी कोणताही गैरसमज करून घेऊ नये. कुठलाही अन्यायकारक निर्णय सरकारकडून घेतला जाणार नाही. त्याबाबतचा शब्द राज्याच्या उपमुख्यमंत्री या नात्याने मी स्वतः तुम्हाला देतो. जोपर्यंत आम्ही सरकारमध्ये आहोत, तोपर्यंत कोणावरही अन्याय होऊ देणार नाही,’ अशा शब्दांत अजित पवार यांनी सोलापूकरांना आश्वासन दिले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button