काल राहुल गांधींसोबत मोर्च्यात असलेले मंत्री आज आढळले कोरोना पाॅझिटिव्ह

Rahul Gandhi

चंदीगड :  पंजाबचे आरोग्यमंत्री बलबीर सिंह सिद्धू आज कोरोना (Corona) पॉझिटिव्ह आढळलेत. बलबीर सिद्धू सोमवारी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यासोबत संगरूर येथे  ट्रॅक्टर मोर्च्यात अनेक नेत्यांच्या संपर्कात होते.  मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह, पंजाब काँग्रेसचे प्रमुख सुनील जाखड, उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री हरीश रावत यांच्यासह अनेक मोठे नेते हजर होते. बलबीर  सिद्धू   यांनी ‘शेती वाचवा’ कार्यक्रमात स्टेज सेक्रेटरी म्हणून काम केले.

या दरम्यान ते राहुल गांधी आणि मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांच्याही संपर्कात आले होते. कोरोनाची सौम्य लक्षणे आढळल्यानंतर सिद्धू यांनी स्वत:ला घरातच ‘आयसोलेट’ करून घेतले आहे. आज (मंगळवारी) सकाळी त्यांना  बरे वाटत नव्हते. ताप तसेच अंगदुखीसारखी कोरोनाची लक्षणं जाणवली. त्यानंतर त्यांनी कोरोना चाचणी करवून घेतली.

अहवाल पाॅझिटिव्ह आला. आता बलबीर सिद्धू यांच्या संपर्कात आलेल्या लोकांचीही कोरोना चाचणी करण्यात येणार आहे, अशी माहिती आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER