हवामान विभागाचा अंदाज तंतोतंत खरा ठरला; मान्सून अंदमानात दाखल

Monsoon

मुंबई :- भारताच्या पश्चिम किनारपट्टीला तौक्ते चक्रीवादळ धडकल्यानंतर आता मान्सूनचे आगमन होणार आहे. हवामान विभागाने २१ मे रोजी मान्सून अंदमानात दाखल होणार असल्याचा अंदाज वर्तवला होता. आता हवामान विभागाने वर्तवलेला अंदाज तंतोतंत खरा ठरला आहे. अंदमान-निकोबार येथे मान्सून दाखल झाला असून, पावसाच्या सरी बरसल्या.

हवामान खात्याचे वरिष्ठ अधिकारी के. एस. होसाळीकर यांनीही ट्विट करून मान्सून अंदमानात दाखल झाल्याची माहिती दिली. मोसमी पाऊस आज अंदमानात पोहचला, असं ट्विट होसाळीकर यांनी केलं आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार २१ जूनला नैऋत्य मोसमी वारे हे अंदमान बेटांवर पोहचले असून बंगालच्या उपसागरात कमी दाबाच्या पट्ट्याचे क्षेत्र तयार झाले आहे. त्यामुळे निकोबार बेट, बंगालचा उपसागर, संपूर्ण अंदमान आणि उत्तर अंदमानाच्या काही भागात मान्सूनचा परिणाम दिसून येत आहे. पुढील ४८ तास हा परिणाम दिसून येईल, असेही सांगितले जात आहे. तसेच जूनच्या पहिल्याच आठवड्यात केरळात मान्सून दाखल होईल. तर १० जूनपर्यंत मान्सून तळकोकणात दाखल होईल. त्यानंतर १५ ते २० जून दरम्यान उर्वरित महाराष्ट्र व्यापून टाकेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button