
जम्मू : पुलवामामधील दहशतवादी हल्ल्याच्या घटनेला आज दोन वर्ष पूर्ण झाली, टीकानिमित्त आज पुन्हा एकादा मोठा दहशतवादी हल्ल्या घडवण्याचा कट दहशतवादी संघटनांनी केला. पोलिसांच्या खबरदारीमुळे त्यांचा डाव फसला. जम्मू बसस्थानक परिसरात पोलिसांनी सुमारे सात किलो स्फोटकं जप्त केली.
या प्रकरणी सोहेल नावाच्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. तो नर्सिंग महाविद्यालयाचा विद्यार्थी आहे, चंदीगडमध्ये शिकतो. आयडी स्फोटकं पेरण्यासाठी मला पाकिस्तानातून संदेश मिळाला होता, असे सोहेलने पोलिसांना सांगितले.
पत्रकारपरिषदेत याबाबत माहिती देताना जम्मूचे आयजी मुकेश सिंह (Mukesh Singh) म्हणाले, मागील तीन-चार दिवसांपासून आम्ही हाय अर्लटवर होतो. इंटलिजन्स इनपुटनुसार पुलवामा हल्ल्याच्या स्मृतिदिनी दहशतवादी संघटनांकडून मोठा हल्ला घडवण्याची तयारी करण्यात आली होती. यंदाचा हल्ला हा जम्मू शहरात होणार होता.
या माहितीच्या आधारावर प्रत्येक महत्त्वाच्या ठिकाणी ‘हाय अर्लट’ ठेवण्यात आला होता. काल (शनिवारी) रात्री संशयितरित्या फिरणाऱ्या सोहेलला अटक केली. त्याच्याजवळ एक बॅग होती. त्यात सहा-साडेसहा किलो आयडी स्फोटक सापडली. चौकशीत त्याने सांगितले की तो नर्सिंग महाविद्यालयाचा विद्यार्थी आहे व चंदीगडमध्ये शिकतो. त्याला पाकिस्तानच्या ‘अल बद्र तंजीम’कडून आयडी प्लांट करण्याचा संदेश मिळाला होता. अशी माहिती त्यांनी दिली.
आयडी ‘प्लांट’ करण्यासाठी त्याला तीन – चार ठिकाणांचे टार्गेट देण्यात आले होते. ज्यामध्ये रघुनाथ मंदिर, बसस्टॅण्ड, रेल्वेस्टेशन व लखदत्त बाजार या ठिकाणांचा समावेश होता. आयडी प्लांट केल्यानंतर तो श्रीनगरला जाणार होता. तिथे त्याला अल बद्र तंजीमचा ओव्हर ग्राउंड दहशतवादी अथर शकील खान भेटणार होता व त्यानंतर तो तंजीमसोबत अॅक्टिव्ह होणार होता, असे पोलिसांनी सांगितले.
#WATCH Jammu & Kashmir Police brief media, in Jammu https://t.co/upvLvOGbmH
— ANI (@ANI) February 14, 2021
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला