महापुराच्या आठवणीने सांगली आणि कोल्हापूकर शहारले

Kolhapur

कोल्हापूर : सांगली आणि कोल्हापूरच्या इतिहासातील महापुराचे सर्व उच्चांक मागील वर्षी जुलै -ऑगस्टमध्ये आलेल्या महापुराने मोडले. तोपर्यंत २००५च्या महापुराचा दाखला देणाऱ्या या महापुराने थरकाप उडविला. कृष्णा नदीचे रौद्रा रूप धारण केले होते. सरासरी ५५ फुटांवर पंचगंगेची गेलेली विक्रमी पाणी पातळीने आजूबाजूच्या ग्रामीण भागातील 3500 गावातील 50 हजारपेक्षा अधिक कुटुंबांना कवेत घेतले. 5 ऑगस्टला महापुराने टोक गाठले होते. वर्षभरानंतर याच दिवशी सांगली आणि कोल्हापुरात जोरदार पावसाला सुरूवात झाल्याने महाभयंकर महापुराच्या आठवणीने दोन्ही जिल्ह्यातील नागरिक शहारले.

मागील वर्षी २८ जुलै पासून जोरदार पावसाला सुरुवात जाली. ३१ जुलैला कृष्णा आणि पंचगंगेने धोक्याच्या पातळीवर आली. राजाराम बंधाऱ्यावर ४१ फुटांवर गेली तर ८० बंधारे पाण्याखाली गेले होते. दरम्यान, राधानगरी धरण भरुन चार स्वयंचलीत दरवाजे उघडले. सांगली-कोल्हापूर बायपासवरती उदगाव ओढ्यावरील पुलावर पाणी आल्याने सांगलीकडे जाणारा बायपास रोड बंद झाला. पाणी पातळीत वाढ झाल्याने शहरातील जयंती नाल्याच्या काठावरील कुटुंबाचे स्थलांतर सुरू झाले. बालींगा पूलावरून वाहतूक बंद झाली. २ ऑगस्टला हळदी येथे पुराचे पाणी आल्याने कोल्हापूर-राधानगरी रस्ता बंद झाला. रात्री उशीरा शाहूपूरी आणि कुंभार गल्लीत पाणी शिरले. पंचगंगेची पाणी पातळी ४४ फुटांवर गेली आणि रेडेडोह फुटला.

मागील वर्षी याच दिवशी 5 ऑगस्टला पडलेल्या पावसाने राधानगरी धरणातून १२ हजार क्यूसेक प्रति सेकंद या दराने पाणी पंचगंगेत सोडले जात होते. पंचगंगा आणि कृष्ण नदी काठावरील अनेक गावात पाणी शिरले. शिरोळ तालुक्यात महापुराने अक्षरश: थैमान घातले. पन्हाळ्याकडे जाणारा रस्ता खचला. नदी काठच्या लोकांना पुन्हा सतर्कतेचा इशारा देण्यात आला. महापुरामुळे सर्व शाळा, महाविद्यालय शासकीय कार्यालयांना सुट्टी देण्यात आली. न्यू पॅलेस परिसर, बापट कॅम्प, कसबा बावडा, कदमवाडी, भोसलेवाडी, वडणगे, आंबेवाडी, चिखली, शिरोळ, राधानगरी, करवीर, हातकणंगले आदी तालुके आणि परिसरातील हजारो घरात पुराचे पाणी शिरले. जिल्हाधिकारी कार्यालयातही पुराचे पाणी शिरल्याने शहरवासीयांत भितीचे वातावरण पसरले. पुढील आठ दिवस पंचगंगा नदीची पाणी पातळीत वाढच होत गेली. पुणे-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्ग बंद झाला. तावडे हॉटेल परिसरह बंद झाल्याने शाहू नाका हे एकच शहराचे प्रवेशव्दार खुले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER