‘MBBS’ची परीक्षा जून महिन्यात होणार; अमित देशमुख यांची घोषणा

MBBS Exam - Amit Deshmukh

मुंबई : MBBSच्या पहिल्या, दुसऱ्या व तिसऱ्या वर्षाच्या परीक्षा आता जून महिन्यात होणार आहे, असे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी आज सांगितले आहे. वाढत्या कोरोनाच्या (Corona) पार्श्वभूमीवर परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर आता या परीक्षा जून महिन्यात होणार असल्याचे अमित देशमुख (Amit Deshmukh) यांनी सांगितले आहे.

विद्यार्थ्यांचे परीक्षा केंद्रावर येणे-जाणे किंवा अन्य ठिकाणी जाण्यात बऱ्याच अडचणी येत होत्या. शिवाय अनेक विद्यार्थ्यांना कोरोना संसर्ग झाल्याचे समोर आले. हे सर्व पाहता परीक्षा पुढे ढकलणे शक्य असल्याने, आम्ही हा निर्णय घेतला, असे अमित देशमुख यांनी सांगितले आहे.

राज्यातील विविध शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांत सुमारे ४५० प्रशिक्षणार्थी डॉक्टर आणि त्यांच्या संपर्कातील ३५० जण कोरोना संसर्गाने ग्रासले आहेत. त्यामुळे प्रशिक्षणार्थी डॉक्टरांना चांगल्या आरोग्य सुविधा द्यावेत, अशी मागणी प्रशिक्षणार्थी डॉक्टरांकडून करण्यात आली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button