मुंबईचा महापौर काँग्रेसचाच असेल – बाळासाहेब थोरात

Balasaheb Thorat

मुंबई :- मुंबईचा महापौर काँग्रेसचाच असेल, असे म्हणून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी काँग्रेस मुंबई मनपाची निवडणूक स्वबळावर लढणार असल्याचा संकेत दिला. (Balasaheb Thorat claim that next Mumbai Mayor will be of Congress).

बाळासाहेब थोरात म्हणालेत, काँग्रेस पक्षाच्या आवाजाने मुंबई महानगरपालिकेची निवडणूक गाजणार आहे. काँग्रेसने पूर्ण ताकद लावली तर मुंबई काँग्रेसचा महापौर होण्यापासून कुणीही रोखू शकत नाही. सरकार आले, त्यात काही प्रश्न आहेत, असे म्हणत थोरात यांनी महाविकास आघाडीतील कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली.

मुंबईचा‌ महापौर काँग्रेसचा झाला पाहिजे, असे कार्यकर्त्यांना आवाहन केले. अशोक चव्हाण (Ashok Chavan) म्हणाले, “भाजपाला रोखण्यासाठीच महाराष्ट्रात महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकार स्थापन झाले. आघाडी सरकार ‘कॉमन मिनिमम प्रोग्राम’वरच चालेल. सोनिया-राहुल गांधी यांच्या विचार आणि भूमिकेवर सरकार चालेल.” त्यांनी शिवसेनेला अप्रत्यक्ष इशाराही दिला, भाजपचा ‘सामाना’ करायचा आहे हे विसरू नका. अन्यथा, दोन हात सामना आम्हीही करू.

ही बातमी पण वाचा : सरकारच्या भविष्याची जबाबदारी फक्त कांग्रेसची नाही – नसीम खान

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER