ख्रिश्चन तरुणी आणि मुस्लिम तरुणाचे लग्न चर्चने ठरवले अवैध, दोन पाद्रींना दंड

Christian Marriage - Syro-Malabar Church

केरळमधील (Kerala) सायरो मलबार चर्चमध्ये (Syro-Malabar Church) एका ख्रिश्चन तरुणी आणि मुस्लिम तरुणाचे झालेले लग्न केरळच्या चर्चने अवैध ठरवले व अशा प्रकारच्या लग्नाला प्रोत्साहन दिल्याबद्दल दोन पाद्रींनाही दंड ठोठावला.

हे लग्न २०२० झाले आहे. वाद निर्माण झाल्यानंतर या लग्नाच्या चौकशीसाठी सायरो मलबार चर्चने एक समिती स्थापन केली होती. या समितीने हे लग्न बेकायदेशीर ठरवले आहे. या लग्नात चर्चने ठरवलेल्या ‘कॅनन कायद्या’चे उल्लंघन झाल्याचे समितीने म्हटले आहे. चर्चचे आर्क बिशप मार जॉर्ज एलेनचेरी यांनी आक्षेप नोंदवला होता. अशा प्रकारच्या आंतरधर्मीय लग्नाला प्रोत्साहन दिल्याबद्दल चर्चच्या दोन पाद्रींना दंड ठोठावण्यात आला आहे.

या संदर्भात उल्लेखनीय आहे की, ज्या २२ चर्चचा थेट रोमशी संबंध आहे त्यात सायरो मालबरो चर्चचा समावेश आहे. या चर्चमध्ये होणाऱ्या सर्व विवाहांमध्ये ठरवलेल्या कॅनन कायद्याचे पालन करणे बंधनकारक आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER