संक्रांतीनिमित्त बाजारपेठ सजली

Makar Sankranti

कोल्हापूर : तिळ आणि गुळाच्या स्नेहगुणांचा सण म्हणजेच मकर संक्रांत (Makar Sankrant). आपल्या स्नेहींना या दिवशी तिळगूळ देऊन ‘तिळगूळ घ्या, गोड-गोड बोला’ असे म्हणून एमकेकांशी प्रेमाचे संबंध कायम ठेवण्याचे आवाहन केले जाते. यासाठी आतापासून बाजारपेठा सणाच्या मिठायांनी सजल्या आहेत.

सणाचा गोडवा वृद्धिंगत करण्यासाठी काजू, सुकामेवा, बदाम, अंजिराचा वापर करून तयार केलेले तिळासकटचे लाडू तसेच चिक्की, तिळाच्या वड्या, रेवड्या, साखरेचा हलवा असे अनेकविध तिळगुळातील पदार्थांच्या राशी बाजारात पाहायला मिळतात. काटेरी हलव्यात एका रंगाचे, चार तसेच पंचरंगीही असे वैविध्यपूर्ण प्रकार उपलब्ध आहेत.

मकर संक्रांतीसाठी नववधू आणि बालकांसाठी हलव्याच्या दागिन्यांचे वैविध्यपूर्ण प्रकार यंदा पाहायला मिळत आहेत. यंदा स्त्रियांप्रमाणे पुरुषांच्याही दागिन्यांमध्ये वैविध्य आहे. पारंपारिक हार, कानातले, बाजूबंद, गळ्यातल्यासोबत बांगड्या, पाटल्या, तोडे यामध्ये वेगळेपण दिसून येते. लहान मुलांच्या दागिन्यामध्ये बासरी, मुकुट यासह हातातली वाळी, कडे, गळ्यातले हारही उपलब्ध आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER