मराठा आरक्षण सरकारने सक्षम बाजू मांडवी : खा. संभाजीराजे

Sambhaji Raje

नांदेड : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्द्याबाबत सखोल माहिती असणाऱ्या विद्वानांची समिती बनवून, त्यांचे मार्गदर्शन घेऊन सर्वोच्च न्यायालयात सरकारने बाजू मांडावी, असे मत खा. संभाजीराजे (Shmbhaji Raje) यांनी नांदेड येथे व्यक्त केले.

आज नांदेड येथील मराठा आरक्षण एल्गार मेळाव्याला संबोधित करत असताना, खा. संभाजीराजे यांनी भूमिका मांडली. ते म्हणाले, मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी 2007 पासून माझा लढा सुरू आहे. बहुजन समाज हा एका छताखाली, एकत्र यावा, गुण्यागोविंदाने नांदावा, अशी माझी भूमिका आहे. बहुजन समाजाला एकत्र आणायचे असेल, तर मराठा समाजाला आरक्षण मिळणे ही काळाची गरज आहे.

अशोकराव चव्हाण यांनी समाजातील, योग्य त्या विद्वान लोकांची एक समिती बनवावी. त्यांच्या अभ्यासाचा लाभ, न्यायालयात बाजू मांडताना वकिलांना होऊ शकेल. अधिकारी आणि सरकारने एकदिलाने काम करण्याची आवश्यकता आहे. ती उणीव मागच्या काळात न्यायालयात बाजू मांडताना दिसत राहिली. त्याचा मोठा फटकाही बसला. परंतु यापुढे, त्या चुका टाळत योग्य त्या पद्ध्तीने तयारी करून, कोर्टात समाजाची बाजू मांडली पाहिजे, असे खा. संभाजीराजे यांनी स्पष्ट केले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER