अजितदादांच्या जपामुळे डिपॅाझिट जप्त झालेल्या माणसाला आमदारकी मिळाली ; राष्ट्रवादीच्या नेत्याची पडळकरांवर टीका

Ajit Pawar - gopichand padalkar

मुंबई : राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस आकाश झांबरे पाटील (Akash Zambare Patil) यांनी गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांच्यावर टीकास्त्र सोडले .गेल्या सव्वा वर्षांपासून अजितदादांच्या नावाचा दिवस-रात्र जप आपण करत आहात, अजितदादा हे फळ देणारे झाड आहे. त्याला तुम्ही दगड मारला तरी ते फळ देणार. नाही तर डिपॉझिट जप्त झालेल्या माणसाला आमदारकी कशी मिळाली असती? हे सर्व आपण दिवस-रात्र अजितदादांचा जप केल्यामुळेच होत आहे, अशा शब्दांत गोपीचंद पडळकर यांना टोला लगावला आहे.

पडळकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना पत्र लिहिताना छत्रपती शिवाजी महाराज, राजश्री शाहू महाराज तसेच महात्मा फुले आणि बाबासाहेब आंबेडकर यांचा उल्लेख केला होता. त्यालाच उत्तर देताना या थोर व्यक्तींची आठवण काढल्याबद्दल अभिनंदन व्यक्त करत ही आठवण फक्त तोंडदेखलेपणाची आहे. आपण ज्या पक्षाचे प्रतिनिधित्व करता ते गोळवलकर, हेडगेवार यांच्या विचाराने विषमता, जातीय द्वेष, मनुवादी मानसिकतेतून काम करतात, अशा प्रकारची टीका झांबरे यांनी केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button