बाहूबली सिनेमात असलेलं माहिष्मती साम्राज्य भारतात आधीपासूनच आहे !

Maharashtra Today

बाहूबली चित्रपटानं (Bahubali cinema) भारतासह विदेशात तगडी कमाई केली. तमिळ आणि तेलगू भाषांमध्ये शुट करण्यात आलेला हा सिनेमानंतर देशाविदेशातल्या प्रमुख भाषांमध्ये डब करण्यात आला. बाहूबली सिनेमा पाहिला नाही अशी एक ही व्यक्ती शाधून सापडणार नाही. २०१५ ला बाहूबलीचा पहिला पार्ट रिलीज झाला आणि २०१७ साल दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला आला. स्पेशल इफेक्टस आणि दिग्दर्शक एस.एस. राजामाऊलीच्या (S.S. Rajamauli) व्हिजनमुळं बाहूबलीचं माहिष्मती साम्राज्य प्रत्यक्षात उभारलं. आंध्रप्रदेशात उभारलेला सेट आजही लोकांना पाहण्यासाठी उपलब्ध आहे; पण तुम्हाला माहितीये का? बाहूबलीमध्ये दाखवण्यात आलेलं महाष्मती साम्राज्य प्रत्यक्षात अस्तित्त्वात होतं.

आज भारतासह जगभरात मध्यप्रदेश राज्य म्हणून प्रसिद्ध असलेलं राज्यचं आधी माहिष्मती साम्राज्य होतं. अनेक ऐहासिक दस्ताऐवजात याचा उल्लेख आढळतो. अनेक पुराणकथांमध्येही माहिष्मतीचा उल्लेख आढळतो. भौगोलिक उल्लेखांनूसार ते साम्राज्य मध्यप्रदेश असल्याचंच अनेक कागदपत्रांवरुन सिद्ध होतं. एकेकाळी माहिष्मती हे शहर भारताचं सामाजिक – राजकिय केंद्र होतं.

असं मानलं जातं की माहिष्मती एक प्राचिन जनपद असलेल्या अवंती साम्राज्याचा हिस्सा होत. नंतर विंध्याओंनी अवंती साम्राज्याची दोन हिश्श्यात विभागणी केली. उत्तरेतली राजधानी उज्जेन बनलं तर महाष्मती दक्षिणेच्या भागाची राजधानी होती. या शहराला हैहयास साम्राज्याची जुनी राजधानी मानलं जातं. हैहयास पाच गटांचा एक प्राचीन संघ आहे जो पश्चिम आणि मध्य भारतावर शासन करायचा. पी. के. भट्टाचार्य यांच्या पुस्तकात Historical Geography of Madhya Pradesh From Early Records या पुस्तकात माहिष्मती साम्राज्याचा आणि सम्राटांच्या वंशाचा उल्लेख केलाय. या शहराचा उल्लेख ‘हरिवंम्सा’मध्येही करण्यात आलाय.

योगगुरु पतंजलीनं देखील या विषयी लिखाण केलंय. त्यांच्या लिखाणात माहिष्मतीचा उल्लेख आढळतो. उज्जेनपासून माहिष्मतीला जायला एका रात्रीचा वेळ लागतो असं पतंजलींनी लिहंल. महाभारातामध्ये देखील माहिष्मती नावच्या शहराचा उल्लेख आढळतो.

माहिष्मतीचा राजा नील होता. अग्नि देवताचं नीलच्या सुंदर पुत्रीवर प्रेम जडलं. यामुळं राजा नाराज झाला. अग्निनं राजकुमारीला प्रेमाच्या जाळ्यात ओढण्यासाठी ब्राम्हणाचं रुप घेतलं. राजा नीलला ही गोष्ट कळाल्यानंतर त्यानं ब्राम्हणाला दंड दिला; पण अग्निदेवता त्याच्या मुळ अवतारात आल्यावर राजानं त्याला माफ केलं. राजा नीलनं अग्निदेवाला त्याच्या राज्याचा संरक्षण बनायला सांगितलं. अनेक वर्षानंतर पाडंवांनी अनेक राज्य जिंकली. सहदेवनं माहिष्मतीवर आक्रमण करुन माहिष्मती जिंकून घेतली. यानंतर राजा नीलनं कुरुक्षेत्राच्या युद्धात सहदेवचा सारथी म्हणून काम केला.

अनेक बौद्ध ग्रंथांमध्ये माहिष्मतीचा उल्लेख आहे. पाली ग्रंथांमध्ये उज्जनेला अवंती राज्याची राजधानी दाखवण्यात आलंय. माहिष्मती शहर आवंती साम्राज्याचं मात्र एक हिस्सा होतं असे उल्लेख पाली ग्रंथात आढळतात. इतिहासकार मंडला, महेश्वर आणि म्हैसुरला माहिष्मतीचाच भाग मानतात. माहिष्मतीच्या भव्यतेची कहाणी इतिहासाच्या पानात गडप झाली. बाहूबली सिनेमाच्या निमित्तानं यावर प्रकाश टाकण्यात आला होता.