महाविकास आघाडी सरकार बैलासारखे, सतत टोचत राहावे लागते; गडकरींची टीका

Nitin Gadkari

मुंबई : महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारच्या काळात विकासाच्या कामांचा वेग मंदावला आहे, असे सूचित करताना केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरींनी (Nitin Gadkari) टीका केली – महाविकास आघाडी सरकार बैलासारखे आहे; सतत टोचत राहावे लागते, त्याशिवाय पुढेच सरकत नाही.

ते नागपूर येथे पदवीधर मतदारसंघाचे भाजपा उमेदवार संदीप जोशी यांच्या प्रचारासाठी आयोजित पदवीधरांच्या मेळाव्यात बोलत होते.

नागपूर येथील विमानतळाच्या कामाचे उदाहरण देतांना गडकरी म्हणाले – नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळाची निविदा काढण्यात आली. मात्र सरकार बदलले आणि काम ठप्प झाले. नागपूर ब्रॉड गेज मेट्रोला मंजुरी देण्यासाठी या सरकारला एक वर्ष लागले. भाजपचे सरकार असते तर एक महिन्यात काम झाले असते. महाविकास आघाडी सरकार बैलासारखे आहे. सतत टोचत राहावे लागते, त्याशिवाय ते पुढेच जातच नाही.

पदवीधर-शिक्षक मतदार संघासाठी भाजपा केंद्रीय निवडणूक समितीने महाराष्ट्रात होणाऱ्या आगामी पदवीधर विधान परिषद द्विवार्षिक निवडणूक २०२० साठी उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.

भाजपाकडून प्रसिद्ध केलेल्या यादीनुसार, पुणे पदवीधरसाठी संग्राम देशमुख, औरंगाबादसाठी शिरीष बोराळकर, नागपूरसाठी संदीप जोशी, तर अमरावती पदवीधरसाठी नितीन धांडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER