
हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वांत यशस्वी कलाकारांपैकी एक असलेले देव आनंद बॉलिवूडमध्ये नेहमी स्मरणात राहतील. शतकानुशतके त्यांची उत्कृष्ट कामगिरी आणि उत्कृष्ट शैलीबद्दल चर्चा होईल. देवसाहेबांच्या जीवनातले शेकडो किस्से आहेत; परंतु त्यांचे सुरैयावरचे प्रेम आणि नंतर या प्रेमाचा वेदनादायक अंत चित्रपटाच्या कथेपेक्षा कमी नाही. ३ डिसेंबर रोजी देव आनंद यांच्या नवव्या पुण्यतिथीनिमित्त आपण अपूर्ण प्रेमाची संपूर्ण कहाणी जाणून घेऊ. सुरैया त्या काळातील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्री होत्या. त्यांच्याकडे लांब मोटारी होत्या.
दुसरीकडे देव आनंद शूटिंगवर पायी येत असे. तरीही देवसाहेबांचा प्रचंड आत्मविश्वास होता. त्यांची ही जगण्याची शैली सुरैया यांना खूप आवडली होती. देव आनंद पहिल्यांदा ‘विद्या’ चित्रपटाच्या सेटवर सुरैया यांना भेटले. सेटवर देव आनंद हे सुरैया यांच्याबरोबर खूप फ्लर्ट करायचे. ‘रोमान्सिंग विथ लाइफ’ या पुस्तकात त्यांनी लिहिलं ‘विद्या’च्या सेटवर वाजलेलं हे गाणं… कॅमेरा रोल झाला. सुरैया यांनी मला मागून मिठी मारली.
मला त्यांच्या श्वासाची उबदार भावना जाणवली. मी त्याच्या हाताचे चुंबन घेतले आणि मग एक उडणारे चुंबन त्यांच्याकडे (Flying Kiss) सोडले. सुरैया यांनी स्वतःच्या हाताच्या मागच्या बाजूचे चुंबन घेत उत्तर दिले. दिग्दर्शक ओरडून म्हटले, “ग्रेट शॉट.” सुरैया आणि देव आनंद यांची जवळीक वाढू लागली. पण सुरैया यांच्या आजींनी हे संबंध नाकारले होते. आजी प्रत्येक वेळी सुरैयासोबतच राहात होत्या. एक दिवस सुरैया सेटवर शूटिंग करत होत्या.
आजीही त्यांच्यासमवेत उपस्थित होत्या. पण काही कामानिमित्त आजींना घरी जावे लागले. देव आनंद यांनी या संधीचा फायदा उचलला आणि ते सुरैयाच्या मेकअप रूममध्ये शिरले. सुरैया आणि देव आनंद सुमारे ४५ मिनिटे बोलत राहिले. देवसाहेबांनी सुरैयासमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला आणि त्यासोबत एक अंगठी दिली. सुरैया यांच्या आजीला ही बातमी कळताच त्या रागाने लाल झाल्या. आजींनी देवसाहेबांची पाठविलेली रिंग समुद्रात फेकली. आणि मग या कहाणीचा वेदनादायक अंत झाला.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला