शाहांचे पाय लागतील तिथे कमळ फुलते ; राणे समर्थक नगरसेवकांच्या राजीनाम्यानंतरही भाजपला विश्वास

Amit Shah - Rajan Teli

सिंधुदुर्ग : वैभववाडीतील भाजपच्या सात नगरसेवकांनी राजीनामा देत शिवसेनेत (Shiv Sena) प्रवेश केला .त्यानंतर भाजपचे (BJP) सिंधुदुर्ग (Sindhudurg) जिल्हाध्यक्ष आणि माजी आमदार राजन तेली (Rajan Teli) यांनी मजबुतीने निवडणुकांना सामोरं जाण्याचा विश्वास व्यक्त केला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांचे पाय जिथे लागतात, तिथे भाजपचे कमळ फुलतं, अशी प्रतिक्रिया तेलींनी व्यक्त केली.

भारतीय जनता पक्ष सिंधुदुर्गात मजबूत आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आल्यानंतर भाजप आणखी मजबूत झाली आहे. अमित शाहांचे पाय जिथे जिथे लागतात, तिथे तिथे भारतीय जनता पक्षाचं कमळ फुलतं, हा देशातला इतिहास आहे. भाजप मजबुतीने उद्याच्या निवडणुकांना सामोरा जाईल, असेही राजन तेली म्हणाले.

आरक्षण पडल्यानंतर आपल्याला पुन्हा उमेदवारी मिळणार नाही, याची जाणीव झाल्याने भाजपच्या सात नगरसेवकांनी हे पाऊल उचलले आहे. वैभववाडीत भारतीय जनता पक्ष मजबूत आहे. दोन महिन्यांनंतर होणाऱ्या निवडणुकीत भाजप सर्व 17 जागांवर जिंकेल, असा विश्वास राजन तेली यांनी व्यक्त केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER