राधानगरी अभयारण्याचा स्पर्धेतून तयार होणार लोगो

Kolhapur

कोल्हापूर : राधानगरी अभयारण्याच्या पर्यटन विकास उद्देशाने राधानगरी अभयारण्यासाठी लोगो करण्याचा निर्णय वन विभागाने घेतला आहे. वन्यप्राणी प्रेमी, वृक्षप्रमी, विद्यार्थी व नागरिकांना या प्रक्रियेत सहभागी होण्याकरीता “राधानगरी अभयारण्य लोगो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. इच्छुक स्पर्धकांनी स्वतः तयार केलेला ओरिजनल लोगो सादर करून स्पर्धेत सहभागी व्हावे असे आवाहन वन विभागाने केले आहे.

लोगोमध्ये राधानगरी अभयारण्याचे ठळक बाबी समोर आणाव्यात. जिल्हयाचे प्रेक्षणीय अभयारण्य महाराष्ट्रातील पहिले अभयारण्य, शाहू महाराजांनी राखलेले वन, राधानगरी व काळम्मावाडी धरण, रानगवाचे वस्तीस्थान, युनोस्कोची वर्ल्ड हेरिटेज साइट, शिवगड व रंजन गड किल्ल्यांचा समावेश असणारे अभयारण्य , बायोडायवर्सिटी हॉट हॉट, एंडेमिझमचे उत्कृष्ट उदाहरण असे लोगोतून संबोधित कराव्यात. [email protected] • लोगो पाठवण्याची अंतिम तारीख :- १५ ऑक्टोबर २०२० विजेता स्पर्धकाचा लोगो राधानगरी अभयारण्याचा शासकीय चिन्हाकीत करण्यात येणार आहे. ही स्पर्धा सर्वासाठी खुली असून मोफत आहे. विजेत्यांना बक्षीस आणि प्रमाणपत्र दिले जाणार आहे..

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER