महिलांसाठी उद्यापासून लोकलचा प्रवास झाला खुला

Local Tarin-Piyush Goyal

मुंबई :- केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल (Piyush Goyal) यांनी उद्यापासून सरसकट सर्व महिलांना लोकल प्रवासाची परवानगी असल्याची घोषणा ट्विटरवरून केली आहे. सर्व महिलांना उद्यापासून सकाळी ११ ते दुपारी ३ आणि संध्याकाळी ७ नंतर मुंबई लोकल (Mumbai Local) सुरू असेपर्यंत ट्रेनमधून प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे. आम्ही महाराष्ट्र शासनाच्या पत्रानुसार त्वरित परवानगी देत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

राज्य सरकारने महिलांना लोकलचा प्रवास करू द्यावा यासाठी पुन्हा एकदा रेल्वे बोर्डाला पत्र लिहिले होते. राज्य सरकारने घटस्थापनेच्या एक दिवस आधी म्हणजेच शुक्रवारी लोकल प्रवासाला सरसकट सगळ्या महिलांना परवानगी देण्याची मागणी केली होती. पण यासंदर्भातील परवानगी रेल्वे बोर्डाने नाकारली होती.

मला घोषित करण्यास आनंद होत आहे की, उद्यापासून सर्व महिलांना सकाळी ११ ते दुपारी ३ व सायंकाळी ७ नंतर मुंबई उपनगरीय रेल्वेतून प्रवास करण्याची परवानगी देण्यात येत आहे. रेल्वेची नेहमीच तयारी होती.  त्यामुळे आज मिळालेल्या महाराष्ट्र शासनाच्या पत्रानुसार आम्ही त्वरित परवानगी देत आहोत, असे गोयल म्हणालेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER