कर्ज सुविधा गॅरंटी योजनेत आणखी २७ क्षेत्रांचा समावेश

Cash

नवी दिल्ली : कोरोना (Corona) संकट काळात सुरू करण्यात आलेल्या कर्ज सुविधा गॅरंटी योजनेत (ईसीएलजीएस) (ECLGS) आणखी २७ क्षेत्रांचा समावेश करण्यात आला आहे. त्यात आरोग्य क्षेत्रही समाविष्ट आहे.

कोरोना संकटामुळे अनेक उद्योगधंदे अडचणीत आलेले आहेत. अशा उद्योगांना त्वरित खेळते भागभांडवल उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने कर्ज सुविधा गॅरंटी योजना राबविण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला होता. यासंदर्भात कामत समितीची स्थापना करण्यात आली होती. समितीच्या बहुतांश शिफारशी केंद्राने स्वीकारल्या आहेत. आता नॅशनल क्रेडिट गॅरंटी ट्रस्टी कंपनी लिमिटेड अर्थात एनसीजीटीसीने ‘ईसीएलजीएस २.०’ योजना राबविण्याच्या अनुषंगाने दिशानिर्देश जारी केले आहेत. सरकारने चालू महिन्याच्या सुरुवातीला आत्मनिर्भर पॅकेज ३.० जाहीर केले होते. त्यातही ईसीएलजीएस योजनेचा उल्लेख करण्यात आला होता.

ज्या कंपन्यावर २९ फेब्रुवारी २०२० च्या स्थितीनुसार एक महिना वा त्यापेक्षा कमी काळासाठी थकबाकी ५० कोटी रुपयांपेक्षा अधिक आणि ५०० कोटी रुपयांपर्यंत कर्ज आहे, अशा कंपन्या ईसीएलजीएस २ योजनेसाठी पात्र असतील, योजनेअंतर्गत पाच वर्षांसाठी कर्ज उपलब्ध करून दिले जाईल. पात्र कंपन्या अथवा कर्जदार एकूण कर्जापैकी २० टक्क्यांपर्यत अतिरिक्त कर्ज उचलू शकतात.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER